Headlines

केंद्रात दोन, राज्यामध्ये एका कॅबिनेट मंत्रिपदासाठी शिंदे यांची दिल्ली वारी:इकडे फडणवीसांसोबत वर्षावर जयंत पाटील, तटकरे, पटेलांची बैठक




‘ऑपरेशन टायगर’ राबवून उद्धवसेनेचे सहा खासदार फोडल्यामुळे केंद्रीय स्तरावर शिवसेनेचे (शिंदे गट) वजन वाढवण्याची तयारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. सूत्रांनी सांगितले की, या तयारीचाच एक भाग म्हणून त्यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर आपल्या नंदनवन या शासकीय बंगल्यावर शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी केंद्रात आणखी दोन मंत्रिपदे तसेच राज्यात एका कॅबिनेट मंत्रिपदावर दावा केला आहे. आपला दावा मांडण्यासाठी मंगळवारी रात्री दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शिंदे यांनी भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये 45 मिनिटे चर्चा झाली. यावेळी सहाही बंडखोर खासदार उपस्थित होते. तुम्हाला तुमच्या मतदारसंघातील महत्त्वाच्या योजना, विकास कामांसाठी निधी दिला जाईल, असे आश्वासन शहा यांनी दिले. राष्ट्रवादीकडून मुंडेंच्या पुनरागमनासोबत शेळके, नवघरेंना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठ्या फेरबदलाची तयारी सुरू आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, वादग्रस्त ठरलेले नरहरी झिरवळांच्या जागी आक्रमक ओबीसी नेते धनंजय मुंडे यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन निश्चित मानले जात आहे. पक्षीय विस्तार आणि प्रादेशिक समतोल साधण्यासाठी पुणे जिल्ह्यातून तरुण चेहरा सुनील शेळके आणि विदर्भातून राजू नवघरे यांना मंत्रि‍पदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. नव्या-जुन्यांच्या समीकरणांमुळे अंतर्गत नाराजी दूर होऊन आगामी निवडणुकांसाठी पक्ष संघटना अधिक मजबूत होईल. या फेरबदलामुळे सरकारमध्ये राष्ट्रवादीचा राजकीय वरचष्मा आणि आक्रमकता आणखी वाढणार, हे मात्र स्पष्ट आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळात देत असाल तर कॅबिनेट मंत्रिपद द्या, असे सुनेत्रा पवारांनी भाजप श्रेष्ठींनी म्हटल्याचेही सूत्रांनी सांगितले. खा. ओमराजे, बंडू जाधव यांच्यात रस्सीखेच सुरू सूत्रांनी सांगितले की, 17 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यात एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकते. उद्धवसेनेतून शिवसेनेत दाखल 6 खासदारांमध्ये केंद्रीय राज्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच आहे. यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव यांची नावे आघाडीवर आहेत. जयंत पाटलांच्या वर्षा दौऱ्याने शरद पवार गट एनडीएसोबत जाण्याची चर्चा सूत्रांनी सांगितले की, मंगळवारी रात्री उशिरा जयंत पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले. त्यावेळी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. त्यामुळे शरद पवार गट एनडीएसोबत जाण्याची चर्चा सुरू झाली. रोहित पवार वगळता शरद पवार गटाचे नऊही आमदार सत्तेत जाण्यास इच्छुक आहेत. सर्व आठ खासदारांचेही मत केंद्रात एनडीएला बाहेरून पाठिंबा द्यावा. आणि सत्तेचे सर्व लाभ पदरात पाडून घ्यावेत, असे असल्याचे सांगितले म्हटले जाते. दोन दिवसांपूर्वी पाटील यांनी आमदारांची या विषयी मते जाणून घेतली होती, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. काही राजकीय विश्लेषकांच्या मते पाटील यांची ही बैठक फक्त विकास कामांसाठीच होती. त्यात कोणताही राजकीय विषय नव्हता. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील म्हणाले की, काही चांगले होणार असेल तर त्याासाठी थोडी वाट पहावी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *