![]()
वैजापूर तालुक्यातील खंडाळा, कोल्ही, सुदामवाडी, आलापुरवाडी, शिवूर या गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्ही येथील मध्य प्रकल्पाच्या पाण्याच्या पातळीत वाढत्या उष्णतेमुळे झपाट्याने घट होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातच अवैधरित्या होत असलेल्या पाणीउपशामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण या कोल्ही प्रकल्पात अवघा ३३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. सदरील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रकल्पातील पाणीसाठा जपून ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मार्च महिन्यात कोल्ही प्रकल्पामध्ये ६० टक्के पाणीसाठा असल्याने या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात अवैध पाणीउपसा सुरू होता. त्यामुळे अवघ्या वीस दिवसांत प्रकल्पात ३३ टक्के पाणीसाठा उरला. याबाबत खंडाळा ग्रामस्थांनी नांदूर-मधमेश्वर प्रकल्प विभाग (वैजापूर) यांना निवेदन देऊन सदरील अवैध पाणीउपसा थांबवण्याची मागणी केली होती. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवैध उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांना नोटीस बजावली. विद्युत मोटारी काढून घेण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर महावितरण विभागाला प्रकल्प परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करावा, असे लेखी पत्र देण्यात आले होते. परंतु कोणत्याही उपाययोजना न झाल्याने कोल्ही प्रकल्पात २० ते २५ दिवस पाणी पुरेल. प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावांना गंभीर स्वरूपात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अवैध पाणीउपसा वेळीच थांबविला असता तर प्रकल्पातील पाणी जून महिन्यापर्यंत पुरले असते. परंतु सध्याच्या स्थितीत ते पुरेल, असे वाटत नाही. बोरदहेगाव ६.०८७ कोल्ही ३३.५४ बिलवणी ३०.९१ जरुळ ४०.५९ खंडाळा ० सटाणा १५.५८ गाढे पिंपळगाव १९.२४ मन्याड ६८.२१ कोल्ही प्रकल्पाच्या परिसरात बेकायदेशीररीत्या डीपी कोल्ही प्रकल्पाच्या परिसरात बेकायदेशीररीत्या डीपी उभारण्यात आल्या होत्या. याबाबत संबंधित विभाग व ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत पत्रव्यवहार करून आंदोलनही करण्यात आले होते. परंतु आंदोलकांनी यू-टर्न घेतल्याने ही कारवाई गुलदस्त्यात गुंडाळली गेली असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. अवैधरित्या पाणीउपसा सुरू असल्याने पाणी ढवळून निघाल्याने नळाला दूषित पाणीपुरवठा होत आहे. शेतकऱ्यांना नोटीस बजावल्या ^अवैधरित्या पाणीउपसा करणाऱ्या शेतकऱ्यांना आमच्या कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या परिसरातील वीज खंडित करण्यासाठी महावितरण विभागालाही पत्रव्यवहार करण्यात आला आहे. जर सध्याही अवैधरित्या पाणीउपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले तर विद्युत मोटारी व पाईप जमा करून संबंधित शेतकऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. -पवन चव्हाण, शाखा अभियंता नांदूर मधमेश्वर मध्य प्रकल्प विभाग वैजापूर
Source link
कोल्ही प्रकल्पातील अवैध पाणी उपसा अद्यापही थांबेना:केवळ 33% साठा, खंडाळा परिसरातील विहिरींनी देखील गाठला तळ