.

अक्कलकोट कृषी विभागाने स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र शेळगांव ता. परांडा जिल्हा धाराशिवचे प्रोपरायटर रत्नाकर कोले यांनी विक्रीसाठी आणलेल्या निर्मल सीड्स प्रा. लि. कंपनीचे उडीद पिकाचे वाण एनयुएल ७ विश्वास बॅगची हुबेहूब नक्कल करून आबा कृषी सेवा केंद्र अक्कलकोट येथील गोडाऊनमध्ये ४३२ बॅग व त्यांनी विक्री केलेले ४८ असे एकूण ४८० बॅग (प्रति ५ किलो) एकूण किंमत ८ लाख ४६ हजार ७२० रुपयांचे बियाणे जप्त केले. सदर बोगस बियाणे विक्रेते यांचेवर रात्री उशिरा अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, पाचोरा, जिल्हा जळगाव या कंपनीच्या नावाने उत्पादित केलेले उडीद पिकाचे सत्यप्रत बियाणे वाण एन यु एल ७ (विश्वास) चे पॅकिंग साईज ५ किलो वजनाचे व लाट नं. टी-३४७२५४ असलेले एकूण ४८० पाकिटे असा माल रत्नाकर कोले यांच्याकडून मेमो क्रं. ३०३ दि. १५ मे २०२६ अन्वये खरेदी केला असल्याचे आढळले. त्यापैकी त्यांनी ४८ पाकिटे शेतकऱ्यांना विक्री केली होती व उर्वरित ४३२ पाकिटे साठा पथकास आढळला. याची एकूण छापील किंमत ८ लाख ४६ हजार ७२० रुपये (१९६० प्रत्येकी x ४३२ बॅग आणि उर्वरित माल मिळून) आहे. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले व कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांचे मार्गदर्शनाखाली केली.
प्रतिनिधी |बार्शी तालुका कृषी विभागाने बोगस बियाणे विक्री करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई करत सुमारे ७ लाख ५२ हजार रुपये किमतीचे बनावट उडीद बियाणे जप्त केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक टळली. जप्त केलेले सर्व बोगस बियाणे ताब्यात घेण्यात आले असून शहर पोलिस ठाण्यात संबंधित बोगस बियाणे विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान व पिकांची हानी टळली आहे. मंगळवारी (दि. २६) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास तालुका कृषी अधिकारी कार्यालयास बोगस उडीद बियाणे विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे तातडीने पथक तयार करून कारवाई करण्यात आली. स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र, शेळगांव (ता. परांडा) चे प्रोपरायटर रत्नाकर रघुनाथ कोले यांनी निर्मल सीड्स प्रा. लि. कंपनीच्या उडीद पिकाच्या एनयूएल ७ ‘विश्वास’ या वाणाची हुबेहूब बनावट केलेले बियाणे विक्रीसाठी आणले होते. कृषी विभागाच्या पथकाने शहरातील स्वराज कॉलनी येथील गोडाऊनवर छापा टाकला. तपासणी दरम्यान गोडाऊनमध्ये २१६ बॅग आणि यापूर्वी विक्री केलेल्या १६८ बॅग अशा एकूण ३८४ बॅग (प्रत्येकी ५ किलो) बनावट उडीद बियाणे आढळून आले. संतोष कोयले, तालुका कृषी अधिकारी बार्शी.
जप्त केलेल्या बियाण्याची एकूण किंमत ७,६२,६४० रुपये आहे. प्रति बॅग १९६० रुपये दराने हे बियाणे विकले जात होते. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले व कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे, उपविभागीय कृषी अधिकारी कुर्डुवाडी संजय वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तालुका कृषी अधिकारी, बार्शी संतोष कोयले, , अतुल जाधव, बाळू बागल, किशोर अंधारे, गणेश पाटील उपस्थित होते.
^ बॅगवरील क्यूआर कोड स्कॅन केला असता, त्यामध्ये पीक, वाण, वर्ग, उत्पादन संस्था, तपासणी तारीख, वैधता शुद्धता, उगवण क्षमता इ. माहिती पत्रक दिसले नाही व डुप्लिकेट पॅकेट क्यूआर स्कॅन केल्यानंतर कंपनीची माहिती दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी करताना शासनाच्या साथी पोर्टलवर सदर बॅगांची नोंदणी आहे का पाहावे. चंद्रकांत मंगरुळे, तालुका कृषी अधिकारी ^बियाणे खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच पक्के बिल घेऊन खरेदी करावी. संशयास्पद बियाणे आढळल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा. संतोष कोयले, तालुका कृषी अधिकारी,
अधिकृत विक्रेते: नेहमी कृषी विभागात नोंदणीकृत आणि अधिकृत परवाना असलेल्या विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करा. पक्के बिल (पावती): विक्रेत्याकडून खरेदीची पक्की पावती (बिल) घ्या. त्यावर बियाण्याचे पीक, वाण, लॉट नंबर , आणि खरेदीदार शेतकऱ्याचे नाव असणे आवश्यक आहे. बियाणे उगवले नाही, तर हे बिल कायदेशीर कारवाईसाठी मुख्य पुरावा ठरते. पाकिटाची तपासणी: बियाण्याचे पाकिट सीलबंद आहे का नाही याची खात्री करा.