![]()
करमाड या वर्षीचा पाऊस हंगाम अर्ध्यावर येऊन ठेपला आहे. पावसाच्या तुटीमुळे जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६ मध्ये आजअखेर ५ लाख ५२ हजार ४९३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. ती जिल्ह्याच्या सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ६ लाख ८१ हजार ६०९ तुलनेत केवळ ८१ टक्के आहे.शेतकऱ्यांचे नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कापूस पिकाची तर पेरणी क्षेत्राच्या सरासरी ६२.७५% झाली आहे. त्यामुळे खरीप उत्पादनात या वर्षी कमालीची घट होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात आजअखेर एक जून २०२६ ते २२ जुलै २०२६ या कालावधीची सरासरी पर्जन्यमान २३३.२ मिलिमीटर असून २२८.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तो आजच्या सरासरीच्या ९८.२% आहे. जून महिना तर पावसाअभावी कोरडा गेला आहे. त्यामुळे कपाशी पेरणीला उशीर होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी पेरणीकडे अंतर राखले आहे. मागच्या वर्षी जिल्ह्यात ३ लाख ८८ हजार ५३३ हेक्टर सरासरी क्षेत्राच्या प्रत्यक्ष २ लाख ८२ हजार ९८५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. एकूण क्षेत्राशी ७३ टक्केवारी होती. या वर्षी कपाशीचे प्रस्तावित क्षेत्र ३ लाख ८ हजार ४५४ हेक्टर असून प्रत्यक्षात आजपर्यंत २ लाख ४३ हजार ८२२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. ती सरासरीच्या २२.७५% आहे. पेरणीचा हंगाम संपत आला असल्याने कपाशीसाठी राखीव ठेवलेल्या जमिनीवर आता शेतकरी बाजरी व सोयाबीनची पेरणी करू लागले आहेत. पावसाला सुरू होण्यापूर्वी एल निनो चर्चेचे वादळ उठल्यामुळे ही शेतकऱ्यांनी उशिरा येणाऱ्या कपाशी पिकाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे जिल्ह्यात तुरीचे सरासरी ३१ हजार ११० हेक्टर क्षेत्र असून आज पर्यंत ४९ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली आहे. ती सरासरीपेक्षा १५९.९१% आहे. सोयाबीन पिकाच्या पेरणीतही १४३.८८% वाढ झाली. जिल्ह्यात आजपर्यंत ४९ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी
Source link
खरिप हंगामामध्ये केवळ 81 टक्केच पेरणी:उशिरा व कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात कपाशी पिकाचे 40% क्षेत्र घटले