![]()
संतपरंपरेची पावन परंपरा लाभलेल्या पैठणनगरीचे महाराष्ट्रात विशेष धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आहे. संत एकनाथ महाराजांच्या भूमीत सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन होणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचे मत प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अलका कुबल यांनी व्यक्त केले. श्रीक्षेत्र पैठण येथे संत एकनाथ महाराजांच्या ४२७ व्या षष्ठीनिमित्त तसेच वरुथिनी एकादशीच्या पावन पर्वावर नाथषष्ठी सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला या वेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला खासदार संदिपान भुमरे, आमदार विलास भुमरे, भूषण कावसानकर, तुषार पाटील, या वेळी राजेश सरकटेनिर्मित सांस्कृतिक कार्यक्रमात संत एकनाथ महाराज यांच्या भारुडाने रंगत आणली. यात पुणे, मुंबई येथील कलाकार सहभागी झाल्याने या सांस्कृतिक महोत्सवाचा आनंद पैठणकरांनी घेतला. सभापती वैशाली बोंबले, राजुनाना भुमरे, शिवराज भुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. राजेश सरकटे निर्मित ‘गजर विठ्ठलाचा’ या कार्यक्रमाने उपस्थितांना भक्तिरसात रंगवले. तसेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची उपस्थिती होती. या वेळी आमदार विलास भुमरे यांनी सांगितले की, संत एकनाथ महाराजांच्या पावन भूमीत होणारा हा महोत्सव यापुढे अधिक भव्य स्वरूपात तीन दिवस आयोजित करण्यात येणार आहे. यामुळे संतपरंपरेची ओळख अधिक व्यापक होऊन पैठणच्या धार्मिक व ऐतिहासिक वारशाला राज्यभर नवी ओळख मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी शहादेव लोहारे, दादा बारे, शेखर शिंदे, जालिंदर आडसूळ, सतीश अंधाळेसह महोत्सवासाठी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. नागरिकांची उपस्थिती होती. एकनाथांच्या भारुडाने महोत्सवामध्ये रंगत
Source link
‘गजर विठ्ठलाचा’ कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध:महाराष्ट्रामध्ये पैठणनगरीचे विशेष धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व- अभिनेत्री अलका कुबल