![]()
नोकरीत स्थिरता आणि आणि कुटुंबाच्या सुखासाठी मित्र-मैत्रिणीने अमावास्येला पूजा केली. त्यानंतर त्या तरुणीला सोडण्यासाठी जात असताना भोंदूबाबाने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यानंतर त्याने गळा आवळून खून केला. तर दुसरीकडे, अक्षय या तरुणाच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार करून त्यालाही संपवले, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे. साक्री तालुक्यातील कासारे गावातील रहिवासी असलेल्या जयश्री रजनीकांत काकुस्ते, अक्षय गंगाधर सोनवणे हे दोघे शनी अमावास्येला भोंदू योगेश खैरनारकडे पूजेसाठी गेले होते. नोकरीत सातत्य असावे तसेच कौटुंबिक सुखासाठी त्यांनी पूजा केली. ही पूजा झाल्यानंतर भोंदू योगेश तरुणीला घरी सोडण्यासाठी गेला. मात्र, रस्त्याने त्याने तिच्याशी गैरवर्तन केले. तिने विरोध करताच त्याने ओढणीने गळा अावळला. त्यानंतर अपघात वाटावा म्हणून तिची दुचाकी तिच्या अंगावरच टाकली. दुसरीकडे, अक्षय योगेशची वाट पाहत होता. त्याने योगेशला उशीर का झाला याबाबत विचारणा केली. यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात भोंदू योगेशने अक्षयच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. नंतर त्याचा मृतदेह डोंगरावर पुरला. या थरारनाट्याची कबुली योगेशने पोलिसांना दिली. दरम्यान, भोदू योगेशला रविवारी दुपारी पोलिस बंदोबस्तात न्यायालयात उभे करण्यात आले. त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. योगेशला २३ मे राेजी न्यायालयात उभे केले जाणार आहे. पुढे काय?- जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार कलमे खून प्रकरणात भोंदू योगेशने जयश्री यांना दोषसिद्धीचे कारण सांगितले. शिवाय त्यानुसार कथित पूजादेखील केली. त्यामुळे या गुन्ह्यात योगेशविरुद्ध आता जादूटाेणा प्रतिबंधक कायद्यानुसार वाढीव कलमही लावण्यात येणार आहे. त्यामुळे भोंदूच्या अडचणींत वाढ हाेईल. खुनात वापरलेले साहित्य ठरेल पुरावा अक्षयच्या खुनात वापरलेल्या लोखंडी साहित्याबद्दल संशयिताकडे विचारणा होते आहे. त्याच्याविरोधात हा ठोस पुरावा ठरू शकेल. सध्या त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. या दुहेरी हत्याकांडासाठी त्याला अन्य कुणी मदत केली का, या दिशेनेही तपास होतो आहे. -मयूर भामरे, पोलिस अधिकारी, निजामपूर पोलिस स्टेशन.
Source link
गैरवर्तन करताना तरुणीचा विरोध म्हणून भोंदूने दोघांनाही संपवले:साक्रीतील दुहेरी हत्याकांड; भोंदूबाबा योगेश खैरनारने दिली कबुली