![]()
फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत कौटुंबिक वादातून फायरिंग झाल्याची घटना समोर आली आहे. अभिजीत शंकर शिंगोटे (वय 30) याचा पत्नीसमवेत कौटुंबिक वाद झाल्यानंतर ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत शिंगोटे आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर फायरिंग झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता शिंगोटे किंवा त्याची पत्नी तेथे आढळून आले नाहीत. दोघेही उपचारासाठी रुग्णालयात गेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. घटनास्थळी पोलिसांना रक्त सांडलेले आढळून आले असून, एक शस्त्र आणि एक पुंगळीही सापडली आहे. त्यामुळे फायरिंग नेमके कोणत्या परिस्थितीत झाले, गोळीबारात अभिजित शिंगोटे हे कसे जखमी झाले आहे, तसेच शस्त्राचा वापर कोणी केला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, घटनास्थळाची पोलिसांनी पाहणी करून तेथील पुरावे ताब्यात घेतले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह संबंधित व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या व्यक्तींचीही माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. प्राथमिक माहितीच्या आधारे कौटुंबिक वादातूनच ही घटना घडल्याचे समोर येत असले तरी तपास पूर्ण झाल्यानंतरच फायरिंगचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. याबाबत फरासखाना पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने यांनी सांगितले की, अभिजीत शिंगोटे यांचे मोबाईल रिपेरिंगचे दुकान असून त्याचे कौटुंबिक वादातून पत्नी सोबत घरात भांडण झाले होते. सदर वेळी दोघेच घरात हजर होते. अभिजीत शिंगोटे यांच्या खांद्याजवळ गोळी लागलेली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पिस्तूल कुठून आणली गेली आणि कोणाची होती तसेच कोणत्या कारणाने गोळीबार करण्यात आला त्याबाबत तपास करण्यात येत आहे.
Source link
पुण्यात कौटुंबिक वादातून फायरिंग:पती जखमी, फरासखाना पोलिसांकडून तपास सुरू