![]()
पुण्यातील मांजरी-मुंढवा रस्त्यावर भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार संदीप प्रभाकर मुंढे (वय 38) यांचा मृत्यू झाला. ही घटना 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघातात संदीप यांच्या पत्नी मीनाक्षी मुंढे (वय 36) जखमी झाल्या आहेत. मीनाक्षी यांनीच मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीनाक्षी एका शाळेत नोकरी करतात. 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास संदीप हे पत्नी मीनाक्षी यांना शाळेतून घेऊन दुचाकीवरून घरी निघाले होते. मांजरी-मुंढवा रस्त्यावर समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार संदीप गंभीर जखमी झाले, तर मीनाक्षी यांनाही दुखापत झाली. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या संदीप यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शिल्पा निमकर करत आहेत. महिलेच्या पिशवीतून रोकड चोरी रविवार पेठेतील बोहरी आळी परिसरात खरेदी करणाऱ्या महिलेच्या पिशवीतून सात हजार 360 रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला हिंजवडी परिसरात राहायला आहेत. त्या रविवार पेठेतील बोहरी आळी परिसरात खरेदी करत होत्या. गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतून रोकड चोरली. या प्रकरणी पोलिसांनी तपास करुन सुजाता महादेव जाधव (वय 36, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) हिला ताब्यात घेतले. जाधव हिने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय असून, पोलिस हवालदार मोमीन तपास करत आहेत. दोन दिवसांपूर्वी बोहरी आळीतील कापडगंज परिसरात एका महिलेच्या पिशवीतून दीड लाखांचे दागिने चोरुन नेण्यात आल्याची घटना घडली होती.
Source link
डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार:पुण्यात मांजरी-मुंढवा रस्त्यावर अपघात; पत्नी गंभीर जखमी, डंपर चालकावर गुन्हा दाखल