Headlines

गोवंश वाहतुकीवरून 2 गटांत दगडफेक; तीन गुन्ह्यांची नोंद:तिसरी कारवाई: दगडफेक,‎शासकीय कामात अडथळा‎




दर्यापूर,अमरावती दर्यापूर जवळील बाभळी येथे रविवारी (दि. १७) रात्री गोवंश वाहतूक करणारे वाहन अडवण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार वाद होऊन दगडफेक झाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. याप्रकरणी दर्यापूर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तक्रारींवरून तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून सध्या परिस्थिती शांततापूर्ण आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांतील मुख्य संशयितांसह ४० ते ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात एका गटातील मुकेश काळे, अंकुश गावंडे, सागर बोंद्रे, शिवराज टोळे तर दुसऱ्या गटातील असलम ऊर्फ सोनू रहीम बेग, शोएब अखतर शेख, मोहम्मद काशीद अब्दुल राजिक व इतरांचा समावेश आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दुसरी कारवाई: क्लीनरला मारहाण आणि तोडफोड गोवंशाचे वाहन अडवल्यानंतर शिवराज टोळे व त्यांच्या साथीदारांनी संबंधित वाहनाची तोडफोड केली आणि क्लीनर उजेरखान नईम खान याला मारहाण केली. याप्रकरणी उजेरखान याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई करत सहा जणांविरुद्ध विविध कलमांखाली मारहाणीचा गुन्हा नोंदवला आहे. तिसरी कारवाई: दगडफेक, शासकीय कामात अडथळा घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलीस ‘डायल ११२’ च्या माध्यमातून तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी काही जण गोवंश सोडवून झायलो वाहनाची तोडफोड करत आग लावण्याची भाषा करत होते, तर दुसरा गट त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होता. यावरून दोन्ही गटात वाद होऊन एकमेकांवर दगडफेक सुरू झाली. पहिली कारवाई: गोवंश वाहतूकप्रकरणी गुन्हा दाखल बाभळी येथे एका वाहनातून गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती शिवराज दिलीपराव टोळे व त्यांच्या साथीदारांना मिळाली होती. त्यांनी वाहन अडवून पाहणी केली असता, त्यात सहा जनावरे अत्यंत निर्दयतेने डांबलेली आढळली. याप्रकरणी शिवराज टोळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वाहन चालक आणि क्लीनर उजेरखान नईम खान (रा. आकोट फाईल, अकोला) याच्याविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला. दगडफेकीनंतर घटनास्थळी जमलेली गर्दी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *