Headlines

चंद्रपुरात पिंजऱ्यात अडकवूनही “टी-122’ वाघाला डार्ट मारावाच लागला:20 ट्रॅप कॅमेरे, 3 लाइव्ह कॅमेऱ्यांची नजर




तीन माणसांचा बळी घेणाऱ्या टी-१२२ वाघाला डार्टशिवाय पकडण्यासाठी चंद्रपूर वन विभागाने सामदा परिसरात खास ३० बाय ३० फुटांचा, म्हणजेच ९०० चौरस फुटांचा आणि ८ फूट उंच पिंजरा तयार केला. गोऱ्ह्याच्या आमिषाने वाघाला पिंजऱ्यात आणून वजनसंवेदनशील यंत्रणेने गेट बंद करायचे आणि त्यानंतर ट्रक-माउंटेड पिंजऱ्यात हलवायचे, असे नियोजन होते. नव्याने तयार केलेल्या याच पिंजऱ्यात वाघ आला; मात्र त्याला पुढील पिंजऱ्यात हलवण्याची प्रक्रिया अपेक्षेप्रमाणे पार पडली नाही. अखेर परिस्थिती पाहून डार्ट मारून वाघाला जेरबंद करावे लागले. माणसाची चाहूल लागताच जागा बदलणाऱ्या वाघाला कमीत कमी मानवी हस्तक्षेपात पकडण्याचा प्रयत्न यामुळे पूर्णत्वास गेला नाही. संघर्ष टाळण्यावर भर देणे आवश्यक वनकर्मचाऱ्यांचे संरक्षण आणि वन्यजीवाला होणारा ताण लक्षात घेऊन प्रत्येक टप्पा सुरक्षितपणे राबवणे गरजेचे होते. वाघाला पकडणे हा तातडीचा उपाय असला तरी नागरिकांना वेळेत सूचना देणेही गरजेचे आहे. वन विभागातील यंत्रणांचा समन्वय वाढवून भविष्यातील मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यावर भर द्यावा लागेल. मोहिमेचे यश वाघ पिंजऱ्यात अडकतो आणि सुरक्षितपणे दुसऱ्या पिंजऱ्यात स्थलांतरित होतो का, यावर अवलंबून असते. – राजन तलमले, उपवनसंरक्षक पिंजऱ्यात आला तरी डार्टची वेळ वाघ मोठ्या पिंजऱ्यात अडकल्यावर दरवाजाला ट्रक-माउंटेड पिंजरा जोडण्याचे नियोजन होते. त्यात बकरी ठेवून वाघाला तिकडे हुसकावणार होते. वाघ स्वतःहून पुढे गेला असता, तर डार्टची गरज नसती. मात्र, शेवटी डार्टचा वापर करावा लागल्याने डार्टविना स्थलांतराचा प्रयोग अयशस्वी ठरला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *