Headlines

चटका लावणारी एक्झिट:ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक भूषण देशमुख यांचे निधन




ज्येष्ठ पत्रकार, इतिहासाचे अभ्यासक भूषण गोपाळ देशमुख (वय 64 ) यांचे आज निधन झाले. गेल्या महिन्यात भुईकोट किल्ल्यात हेरिटेज वॉक उपक्रमात लष्करी अधिकाऱ्यांच्या गटाला माहिती देत असताना त्यांना सर्पदंश झाला होता. त्यावर उपचार करण्यात आले. त्यातून बरे झाले होते. काही दिवसांनी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला. प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शनिवार 6 जून रोजी दुपारी त्यांचे निधन झाले. आज सायंकाळी सहा वाजता अहिल्यानगरच्या अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव स्नेहाल रेडिओ येथे अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात येणार आहे. अहिल्यानगर शहरावर अत्यंत प्रेम असणारे, निजामशाहीतील इतिहासाचे गाढे अभ्यासक अशी त्यांची ओळख होती. नगरच्या इतिहासाची ओळख करून देणारा ‘हेरिटेज वॉक ‘ उपक्रम ते अनेक वर्ष चालवत असत. स्नेहालयाच्या ९०.४ FM रेडिओचे ते अनेक वर्ष संचालक होते. अहिल्यानगर शहरात विविध वृत्तपत्रात त्यांनी काम केले. पत्रकारिता करीत असताना ते पत्रकारिता अभ्यासक्रम शिकविणाऱ्या सी.एस. आर. डी. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिकवत होते. पत्रकार म्हणूनही त्यांचे योगदान मोठे आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *