![]()
दिल्ली येथील जंतर-मंतरवर शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर २० जुलै रोजी झालेल्या लाठीचार्ज व अश्रुधुराच्या वापराच्या निषेधार्थ चांदूर बाजार येथे शांततापूर्ण मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी चौकातून दुपारी १२ वाजता निघालेल्या मोर्चा तहसील कार्यालयामध्ये पोहोचून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात जंतर-मंतर येथील घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याच्या अधिकाराचे संरक्षण करावे, विद्यार्थ्यांना न्याय देऊन त्यांच्या भविष्यासोबत होणारा अन्याय थांबवावा, अशा मागण्या निवेदनातमधून करण्यात आल्या. यावेळी “विद्यार्थ्यांवर लाठी नव्हे, न्याय द्या!’ अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. या वेळी प्रहार संघटनेचे तालुका प्रमुख प्रदीप बंड, नगरसेवक सचिन खुळे, जिल्हा संपर्कप्रमुख संतोष किटूकले, मंगेश देशमुख, नगरसेवक मुजफ्फर हुसेन तसेच मनीष नागलिया, नगरसेवक नरेंद्र वानखडे, मनीष एकलारे, आशिष झटाले, स्टेला जवंजाळ, मंगेश लेंडे, मोहम्मद तनवीर अहमद, एजाज अली, गोपाल वानखडे, नगर परिषद उपाध्यक्ष अब्दुल रहेमान, हेमंत कोंडे, आशिष बंड, कृष्णा निंभोरकर, प्रफुल बोकसे, ऋषिकेश पोहकार, निखिल ठाकरे, शुभम खेळ, वेदांत मातकर ,सौरभ खुळे, युवराज बँड, मनोज कडू, ओमप्रकाश बँड, आशिष पानसे, ऋषभ साबळे, यांच्यासह अहिल्याबाई होळकर प्रहार वाचनालयातील विद्यार्थी, जगदंबा स्कूल मधील विद्यार्थी, नगरपरिषद शाळेमधील विद्यार्थी, इतरही विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते.
Source link
चांदूर बाजार येथे विद्यार्थी, नागरिकांचा आक्रमक मोर्चा:दिल्लीतील लाठीचार्जचा केला निषेध, तहसीलदारांना निवेदन