Headlines

दिल्ली येथील लाठीमाराचा निषेध; मोर्शीत विद्यार्थ्यांची तहसीलवर धडक:जिल्ह्यात निषेध आंदोलन, अंजनगाव बारीतही आंदोलनाला पाठिंबा‎



दिल्ली येथील जंतरमंतर परिसरात आपल्या न्याय मागण्यासाठी शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी चार्जचा मोर्शी शहरात सर्वपक्षीय कार्यकर्ते, विद्यार्थ्यांद्वारे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आल

.

दिल्ली जंतर-मंतर परिसरात विद्यार्थ्यांवर झालेली मारहाण ही अत्यंत निषेधार्ह व दुर्दैवी घटना आहे.कोणत्याही विद्यार्थ्यांवर त्याचे विचार मांडल्यामुळे किंवा लोकशाही मार्गाने आंदोलन केल्यामुळे हिंसाचार होणे हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे.या अघोरी लाठी चार्जच्या घटनेत अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून ही घटना लोकशाही मूल्यांना काळीमा फासणारी आहे.विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा.विद्यार्थ्यांच् या अधिकारांवर गदा आणणाऱ्या या घटनेमुळे विद्यार्थी संघटना आणि सुजान नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.तरी विद्यार्थ्यांवर मारहाण करणाऱ्या सर्व संबंधित दोषींवर तात्काळ व कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या संपूर्ण घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी.भविष्यात देशातील कोणत्याही विद्यार्थ्यांवर अशा प्रकारचा हल्ला होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्या. विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीने मत व्यक्त करण्याचा व आंदोलन करण्याचा संवैधानिक अधिकार सुरक्षित ठेवण्यात यावा.विद्यार्थ्यांच् या सुरक्षिततेसाठी केंद्र व संबंधित प्रशासनाने आवश्यक ते ठोस पाऊल उचलावे, अशा मागण्या यावेळी रेटून धरण्यात आल्या.शेवटी एक लेखी निवेदन नायब तहसीलदार चारुदत्त पाटील यांना देण्यात आले.या मोर्चात मोर्शी शहरासह तालुक्यातील विद्यार्थी-विद्यार्थ िनी, सर्वपक्षीय कार्यकर्ते, शिक्षक,डॉक्टर मंडळी,प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट पेपरफुट प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्याच्या घटनेचे पडसाद आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही उमटू लागले आहेत.अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी, पार्डी, उतखेड, अऱ्हाड-कुऱ्हाड, वडगाव जिरे आदी गावांमध्ये विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा दिला. निषेध आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी पेपरफुटीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व रोजगाराचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप केला. न्याय मागण्यासाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बलप्रयोग झाल्याचा निषेध करत,या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, भरती प्रक्रिया पारदर्शक करावी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.यावेळी उपस्थितांनी “विद्यार्थ्यांवर लाठी नव्हे, न्याय हवा”, “पेपरफुटीतील दोषींना शिक्षा करा”, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ग्रामीण भागातील युवकांनीही विद्यार्थ्यांच्या लढ्याला पाठिंबा देत शासनाने संवादातून प्रश्न सोडवावेत आणि विद्यार्थ्यांवरील कारवाईऐवजी त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.या आंदोलनामुळे अंजनगाव बारी परिसरात विद्यार्थी प्रश्नांबाबत जनजागृती निर्माण झाली असून, शासनाच्या पुढील भूमिकेकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *