![]()
सौंदाळा (ता.नेवासे) येथील गावठाण ते भेंडा-वडाळा रस्त्यालगत असलेला सुमारे दीड किलोमीटर लांबीचा पाणंद रस्ता अतिक्रमण मुक्त करून शेतकऱ्यांसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी बुधवारी शेतकऱ्यांनी भर पावसात नेवासे-शेवगाव राज्यमार्गावर सौंदाळा येथे रस्तारोको आंदोलन केले. सौंदाळा गावठाण ते भेंडा-वडाळा रस्त्यालगत असलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्यावरील सर्व अतिक्रमण काढून हा रस्ता कायमस्वरूपी खुला करुन या रस्त्याचे अधिकृत सीमांकन करून दगडी खांब बसविण्याची मागणी करत अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करून रस्त्याचे समतलीकरण व मुरमीकरण करून वाहतुकीसाठी हा रस्ता खुला करून देण्याची मागणी केली. या आंदोलकांचे निवेदन मंडलाधिकारी सरिता मुंडे यांनी स्वीकारुन मुंडे यांनी तहसीलदार व आंदोलकांचे बोलणी करून दिल्यावर आंदोलकांना तहसीलदारांनी याबाबत तातडीने पोलीस बंदोबस्तात रस्ता खुला करण्याचे आश्वसन दिल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी आंदोलकांनी आमच्या मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास शेतकरी व ग्रामस्थांच्यावतीने पुन्हा बेमुदत उपोषण, तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन व रस्ता रोको सारखे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सौंदाळा येथील शेतकरी व ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आले आहे. यावेळी सरपंच शरद आरगडे, बाळासाहेब बोधक, वसंत बोधक, दिलीप बोधक, संकेत बोधक, किशोर बोधक, प्रदीप आरगडे, भाऊसाहेब आरगडे यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
Source link
सौंदाळे येथे पाणंद रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी केला रस्तारोको:रस्ता अतिक्रमण मुक्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी