Headlines

चारनेर येथे अवैधरीत्या पाणी उपसा:महसूल, ग्रामपंचायत प्रशासनाच्या पथकाची कारवाई, भविष्यातही अशा कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा‎



चारनेर धरणातून अवैधरीत्या पाण्याचा उपसा करणाऱ्यांविरुद्ध महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाने संयुक्त कारवाई करत इलेक्ट्रिक पंप, वीज केबल व पाइप जप्त केले. जप्त करण्यात आलेले साहित्य आमठाणा ग्रामपंचायत कार्यालयात आणण्यात आले असून या कारवाईमुळे अवैध पाणी उप

.

चारनेर धरण हे परिसरातील प्रमुख जलस्रोत असून पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही या धरणातील पाणीसाठ्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. मात्र, काही व्यक्तींकडून धरणातील पाण्याचा नियमबाह्य पद्धतीने इलेक्ट्रिक पंपाच्या सहाय्याने उपसा सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी धरणाच्या काठावरून मोठ्या अंतरापर्यंत टाकण्यात आलेले पाईप, वीजपुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केबल तसेच इलेक्ट्रिक पंप आढळून आले. तत्काळ कारवाई करत संपूर्ण साहित्य जप्त करण्यात आले. पुढील कार्यवाहीसाठी ते आमठाणा ग्रामपंचायत कार्यालयात जमा करण्यात आले. ही कारवाई ग्रामविकास अधिकारी बन्सीधर पडूळकर, तलाठी विशाल पाटील, तसेच ग्रामपंचायत आमठाणा येथील कर्मचाऱ्यांनी केली. संबंधित अधिकाऱ्यांनी जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी अशा प्रकारच्या अवैध पाणी उपशाला कोणतीही मुभा दिली जाणार नसून भविष्यातही अशा कारवाया सातत्याने सुरू राहतील, असा इशारा दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *