Headlines

चिमुकल्याचे हातपाय बांधून अमानुष मारहाण!:व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी घेतली गंभीर दखल, सावत्र बापावर गुन्हा दाखल




जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पैशांच्या हव्यासापोटी एका निष्पाप चिमुकल्याचे हातपाय बांधून त्याला अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास येताच जालना आधीक्षकांच्या सूचनेनुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करत या चिमुकल्याची सुटका केली आहे. तसेच या मुलाची वैद्यकीय तपासणी करत त्याला सुरक्षितपने त्याच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आले आहे. या प्रकरणी मुलाच्या आईच्या दुसऱ्या पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना येथील जाफराबाद पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचे नाव अंनिस शेख वजीर असे आहे. केवळ पैशांच्या मागणीसाठी या नराधमाने या निष्पाप चिमुकल्याला डांबून ठेवत त्याचे हातपाय बांधून त्याला अक्षरशः प्राण्यासारखे मारल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हा प्रकार जालन्यात जारी उघडकीस आला असला तरी मारहाणीची घटना ही शिर्डी येथे घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुढील कायदेशीर प्रक्रिया शिर्डी पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती जालना पोलिस अधीक्षकांनी दिली आहे. या घटनेमुळे नगरिकांमधून एकच संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेची दखल बाल हक्क संघटनेने घेतली असून आरोपीला काठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून लहान मुलांवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत जात असल्याचे दिसून येत आहे. मुले तसेच लहान मुलींवर देखील लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे दिसत आहे. यावर पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलावी अशी मागणी समाजातून होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *