![]()
जगभरातील ९९% इंटरनेट डेटा समुद्राखाली अंथरलेल्या केबल्सद्वारे वाहून नेला जातो. गेल्या दहा वर्षांपासून चीनजवळील दक्षिण चीन समुद्र आणि लाल समुद्र हे त्याचे प्रमुख मार्ग होते. मात्र युद्ध, तणाव आणि लालफितीच्या कारभारामुळे आता कंपन्या या मार्गांना टाळत आहेत. एआयसारख्या सेवांसाठी विनाअडथळा वेगवान इंटरनेट मिळावे, यासाठी नवीन इंटरनेट केबल्स थेट हिंदी महासागरातून टाकल्या जात आहेत. या मोठ्या बदलाचा भारताला मोठा फायदा होत असून, मुंबईनंतर आता चेन्नईही जगातील नवीन मोठे इंटरनेट हब बनत आहे. भारत दक्षिण आशियातील सुरक्षित ‘डिजिटल हब’ म्हणून उदयास येत आहे भारत दक्षिण आशियातील सुरक्षित ‘डिजिटल हब’ म्हणून उदयास येत आहे. लक्षद्वीप समुद्राचे केबल कॉरिडॉर म्हणून महत्त्व वाढल्याने भारताला हिंदी महासागरात नवी धोरणात्मक आघाडी मिळेल. त्याचबरोबर, जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांच्या मोठ्या गुंतवणुकीच्या आणि सुधारित डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या संधीही झपाट्याने वाढतील. एखाद्या देशाची अर्थव्यवस्था पंगू बनवू शकते सबमरीन केबल्स जगातील ९९% इंटरनेट वाहतूक हाताळतात, ज्यांच्याशिवाय जागतिक बँकिंग, दळणवळण आणि अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प होईल. येत्या काळात एआय, क्लाउड डेटा आणि सुपरकॉम्प्युटिंगच्या वाढत्या गरजांमुळे त्यांचे धोरणात्मक महत्त्व अनेक पटींनी वाढेल. ही परिस्थिती एका ‘अदृश्य युद्धा’सारखीच आहे, जिथे एखाद्या देशाच्या केबल्स कापल्याने क्षेपणास्त्र न डागताही त्याची अर्थव्यवस्था पंगू बनवता येऊ शकते. सबमरीन केबल कशा काम करतात? फायबर ऑप्टिक तंत्रज्ञान: सबमरीन केबल विजेच्या तारांसारख्या नसतात. त्यामध्ये अतिशय बारीक काचेचे फायबर असतात, ज्यांच्या माध्यमातून डेटा प्रकाशाच्या स्पंदनांच्या स्वरूपात हजारो किलोमीटरपर्यंत जातो. रिपीटर: दीर्घ अंतरावर सिग्नल कमजोर होऊ नये, यासाठी केबलमध्ये ठिकठिकाणी रिपीटर बसवले जातात. केबलच्या आतील धातूच्या थराद्वारे त्यांना वीज मिळते. सुरक्षा: केबलला समुद्राचा दाब आणि नुकसानापासून वाचवण्यासाठी अनेक संरक्षक थरांनी झाकले जाते. किनाऱ्याजवळ त्यांना अधिक मजबूत केले जाते आणि अनेक ठिकाणी समुद्रतळात गाडले जाते. सबमरीन केबल तुटल्यावर काय होते? इंटरनेट पूर्णपणे बंद होत नाही. केबल तुटल्यावर डेटा इतर केबल्सद्वारे पाठवला जातो. याला नेटवर्क रिडंडन्सी म्हणतात. कंपन्या डेटा ट्रॅफिक अनेक केबल्समध्ये विभागून ठेवतात, जेणेकरून एखादी केबल खराब झाल्यावर दुसरी काम करू शकेल. ज्या ठिकाणी केबल्स कमी असतात, तिथे इंटरनेटचा वेग कमी होऊ शकतो किंवा काही सेवा प्रभावित होऊ शकतात. सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीही आवश्यक सेवांसाठी बॅकअप म्हणून काम करू शकते. मात्र एखाद्या भागात केवळ एकच केबल असेल आणि ती तुटली, तर तिथे इंटरनेट पूर्णपणे बंद होऊ शकते.
Source link
चीनच्या मार्गावरून हटत आहेत इंटरनेट केबल:आता हिंदी महासागरात जाळे पसरणार, भारताला फायदा; जगातील 99% डेटा समुद्राखालून चालतो