![]()
शहरात मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांत ३२.३, तर बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत १३.७ असा एकूण ३३ तासांमध्ये शहरात ४६ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात २३३.२ मिमी अपेक्षितच्या तुलनेत २२८.९ मिमी (९८.२ टक्के) पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतही पाऊस झाला. मात्र, लातूर, परभणी, बीड, नांदेड जिल्ह्यात अजूनही चिंतेचे वातावरण आहे. पावसामुळे संभाजीनगरातील सलीम अली सरोवराजवळ, हडकोतील संजय गांधी मार्केट तसेच मित्रनगर परिसरात झाडे उन्मळून पडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, एल निनोच्या सावटाखाली राज्यात १ जून ते २२ जुलै या ५२ दिवसांच्या कालावधीत ४४२.२ मिमी पावसाची अपेक्षा असताना ४०८.१ म्हणजे ९२.९ टक्के पाऊस झाला आहे. अर्थात ही टक्केवारी मुंबई, पुणे, कोकणातील पावसाने वाढली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत राज्यात २८.१ मिमी पावसाची नोंद झाली. अकोला, यवतमाळला आज यलो अलर्ट विदर्भात २२ जुलैला मुसळधार पावसाने हजेरी लावली. २३ जुलै रोजी विविध जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर अकोला, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.
जालना १०४.२%
संभाजीनगर ९८.२%
धाराशिव ८७.२%
बीड ८३.१%
हिंगोली ७२.७%
नांदेड ६९.०%
परभणी ५७.९%
लातूर ५२.४% ४ तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरमध्ये आतापर्यंत अपेक्षित पावसाच्या तुलनेत १०६.४ टक्के, वैजापूर १२८.३, सोयगाव १२३.३ व फुलंब्री तालुक्यात १०९.२ टक्के असा अपेक्षितच्या तुलनेत अधिक पाऊस झाला. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये ९३.६, पैठण ९२.३, कन्नड ९२.४, खुलताबाद ८३.५ तर सिल्लोडमध्ये अपेक्षित पावसाच्या तुलनेत ९७ टक्के पाऊस आहे. मराठवाड्यात दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे सोयाबीन, तुरीसह कपाशीला जीवदान मिळाले. २३ जुलैलाही मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. नाशिक : २७.९, जळगाव : १६ मिमी
नाशिक | नाशिक शहरात बुधवारी पहाटेपासूनच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. रात्री ८.३० पर्यंत २७.९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. १ जूनपासून सुरू झालेल्या या ५२ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात आधीच ४१ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. जळगाव जिल्ह्यात २४ तासांत १६ मिमी पाऊस झाला. मात्र, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाची चिंता कायम आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकला, शनिवारनंतर उघडीप
अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकल्याने मान्सून वारे काहीसे कमकुवत झाले आहेत. त्यामुळे आषाढी एकादशीपर्यंत राज्यात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस कायम राहील. २५ जुलै म्हणजे शनिवारनंतर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाची काहीशी उघडीप मिळण्याची शक्यता आहे. -माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
Source link
छत्रपती संभाजीनगर शहरात 33 तासांत 46 मिमी पावसाची नोंद:अकोला, यवतमाळला आज यलो अलर्ट