Headlines

फुलंब्रीमध्ये महाआरती, भव्य रक्तदान शिबिर, जातेगाव येथे भव्य वृक्षारोपण; विविध शाळांत शालेय साहित्याचे वाटप‎




महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विधान परिषदेचे आमदार सुहास शिरसाट यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी फुलंब्रीच्या वतीने बुधवारी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात फुलंब्री येथील हनुमान मंदीरात भव्य महाआरतीने झाली. याप्रसंगी रक्तदान हेच श्रेष्ठ दान हा संदेश देत फुलंब्री शहरात व बाबरा येथे भव्य रक्तदान शिबिर भरवण्यात आले. एका रक्तदात्यामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते, त्यामुळे सर्वांनी रक्तदानाचा संकल्प करावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले, या दोन शिबिरांमध्ये तब्बल ६० रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले तर जातेगाव येथे भव्य वृक्षारोपण करण्यात आले, तर फुलंब्री शहरातील सर्व शाळांत तसेच टाकळी कोलते येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी आमदार अनुराधा चव्हाण, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल, फूलंब्री मंडळाध्यक्ष सुचित बोरसे, वडोद बाजार मंडळ अध्यक्ष गोपाल वाघ, पंचायत समिती सभापती सभापती सर्जेराव मेटे, उपसभापती अश्विनी आजिनाथ सोनवणे, देवगिरी साखर कारखान्याचे संचालक नितीन देशमुख, नगरसेवक योगेश मिसाळ, बाजार समिती संचालक शिवाजीराव पाथ्रीकर, अप्पासाहेब काकडे, राजू तुपे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष इलियास शाह, नगरसेवक वाल्मीक जाधव, गणेश राऊत, देविदास ढंगारे, संतोष जाधव, माजी नगरसेवक गजानन नागरे,राम बनसोड ,कृष्णा सोटम, अजय शेरकर, आनंदा ढोके, मयूर कोलते, सुदाम पवार यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *