![]()
नीट पेपरफुटी, ढासळलेली शिक्षण व्यवस्था आणि बेरोजगारी यांसारख्या तरुणांच्या प्रश्नांवर जयपूर येथील ‘शहीद स्मारका’वर आयोजित मोठ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांना दोन तरुणांनी थप्पड मारल्याची घटना घडली आहे. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या सीजेपीच्या समर्थकांनी त्या दोन्ही तरुणांना पकडून मारहाण केली. या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणावर गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. या घटनेपूर्वीही घोषणाबाजी करत असताना काही तरुण आपापसात भिडल्याने पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले होते. याशिवाय, धरणेस्थळावरून अनेक आंदोलकांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्याने, अखेर व्यासपीठावरून सर्वांना आपले मोबाईल सुरक्षित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रशासनाने सुरक्षा पुरवायला हवी- सुषमा अंधारे या घटनेवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, मला असे वाटते की आंदोलन कोणाचेही असो, सत्ताधाऱ्यांचे असो किंवा विरोधकांचे असो. मात्र ज्या पद्धतीने या हिंसक कारवाया घडतात याचे कोणीही समर्थन करू शकत नाही. त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे आणि तो मिळालाही पाहिजे. जर काही देशविघातक कृत्य होत असेल तर त्याला सरकार आळा घालेल न. पण ज्या अर्थी पोलिस प्रशासनाने तसेच सरकारने आंदोलनाची परवानगी दिली आहे, तर तिथे सुरक्षेचा प्रश्न पाळलाच गेला पाहिजे. ही घटना अत्यंत दुर्दैवी- विश्वंभर चौधरी यावर सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, हे जर असे झाले असेल तर खरोखर अत्यंत दुर्दैवाची परिस्थिती आहे. दरम्यान, विश्वंभर चौधरी हे अभिजीत दिपके यांच्या पुण्यातील आंदोलनाच्यावेळी सोबत होते. अभिजीत दिपके यांनी सुरू केलेल्या या पक्षाच्या सुरुवातीपासून चौधरी यांनी दिपके यांच्या या आंदोलनाला तसेच त्यांच्या पक्षाला पाठिंबा दिला आहे.
Source link
जयपूरमध्ये अभिजीत दीपके यांना मारहाण:सुषमा अंधारे व विश्वंभर चौधरींकडून घटनेचा तीव्र निषेध, प्रशासनाने सुरक्षा पुरवायला हवी- अंधारे