![]()
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी (१४ आॅगस्ट) रात्री तब्येत बिघडली. रात्री १०.३० वाजेच्या सुमारास त्यांना भोवळ येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात हलवले. रात्री ११.५८ वाजता रुग्णालयात पोहोचले. त्यावेळी त्यांना १०२ अंश ताप, थंडी वाजणे आणि पोटदुखीचा त्रास होत असल्याचे समोर आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉ. विनोद चावरे यांनी जरांगे-पाटील यांची तपासणी केली. त्यांचे रक्त व लघवीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या तपासण्यांचे अहवाल सकाळपर्यंत अपेक्षित असून, त्यानंतर पुढील उपचाराची दिशा ठरवण्यात येणार आहे. ताप, थंडी, कफ अन् अशक्तपणा ताप, थंडी वाजणे, कफ, डोकेदुखी आणि अशक्तपणा अशी लक्षणे आढळून आली आहेत. त्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. रक्त व लघवीच्या तपासण्या करण्यात आल्या असून, त्यांचे अहवाल सकाळपर्यंत येतील. त्यानंतर पुढील उपचार केले जातील. – डॉ. विनोद चावरे, गॅलेक्सी रुग्णालय
Source link
जरांगेंना 102 अंश ताप:रात्री उशिरा संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल, पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यानंतर प्रकृती खालावली