Headlines

जलयात्रेच्या स्वागतावरून वैजापूरमध्ये गटबाजी उघड:सेना-भाजप समोरासमोर, एकाच जलसंवर्धन मोहिमेचे दोन स्वागत सोहळे‎




जलसंवर्धन, नदी पुनरुज्जीवन, शाश्वत पाणी व्यवस्थापनाचा संदेश देणारी ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा सोमवारी दुपारी २ वाजता गंगापूर–वैजापूर रोडवरील शिवपार्वती मंगल कार्यालयात दाखल झाली. आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते ढोल-ताशांच्या गजरात यात्रेचे जल्लोषात स्वागत झाले. या वेळी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे, आ. प्रशांत बंब, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, सभापती कविताताई चव्हाण उपस्थित होते. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, जलसंधारणासाठी लोकसहभाग गरजेचा आहे. जलसंधारण ही केवळ सरकारची जबाबदारी नाही. ही लोकचळवळ आहे. आ. बंब यांच्या नेतृत्वाखाली हा मतदारसंघ जलसमृद्ध होण्यासाठी पुढे जाईल. आ. प्रशांत बंब म्हणाले, पाणी हीच भविष्यातील खरी संपत्ती आहे. गोदावरीपासून नर्मदेपर्यंतचा संदेश प्रत्येक गावापर्यंत पोहोचला पाहिजे. जलसंवर्धन हा सरकारी विषय नाही. तो लोकचळवळ बनला पाहिजे. प्रतिनिधी | वैजापूर ‘गोदा ते नर्मदा’ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेच्या स्वागतावेळी जलसंवर्धनाचा संदेश बाजूला पडत राजकारणच रंगले. सोमवारी (दि. २७) एकाच जलयात्रेसाठी शिवसेना व भाजप-राष्ट्रवादी गटाने दोन ठिकाणी स्वतंत्र स्वागत सोहळे घेत थेट शक्तिप्रदर्शन केले. एकाच मंचावर येण्याऐवजी वेगळे मंच उभारल्याने वैजापुरातील राजकीय फूट उघड झाली असून ‘पाणी की राजकारण?’ असा सवाल आता चर्चेत आला आहे. ‘निर्धार महाराष्ट्राचा संकल्प जलसंवर्धनाचा’ या घोषवाक्याखाली निघालेली जलयात्रा सोमवारी वैजापुरात दाखल झाली खरी; पण पाण्याच्या प्रश्नापेक्षा राजकारणाचाच रंग अधिक गडद दिसला. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतानाही नेत्यांनी एकीचा संदेश देण्याऐवजी वेगवेगळे मंच उभारून आपापली ताकद दाखवण्यावर भर दिला. लाडगाव रस्त्यावरील लक्ष्मीनारायण लॉन्स येथे भाजप-राष्ट्रवादी गटाने जलयात्रेचे स्वागत करत स्वतःची वेगळी लाइन आखली. वर लाडगाव रोडवरील लक्ष्मीनारायण लॉन्स येथे भाजप-राष्ट्रवादी गटाने स्वतंत्र स्वागत सोहळा घेत आपली ताकद दाखवली, तर गंगापूर रोडवरील मुरारी पार्क येथे शिवसेनेने वेगळा कार्यक्रम करत प्रत्युत्तर दिले. दोन्ही ठिकाणी मोठी गर्दी जमवत नेत्यांनी आपापले अस्तित्व ठळक करण्याचा प्रयत्न केला. एकाच उपक्रमासाठी दोन वेगवेगळे मंच उभे राहिल्याने स्थानिक पातळीवरील मतभेद स्पष्टपणे पुढे आले. परिणामी, संदेशापेक्षा शक्तिप्रदर्शनाचाच ठसा या संपूर्ण कार्यक्रमावर उमटला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *