![]()
जायकवाडी धरणातील गोड पाण्यात आढळणारा आणि अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा ‘शिलवर’ हा गावरान मासा एका वर्षानंतर मच्छीमारांच्या जाळ्यात सापडला आहे. स्थानिक मच्छीमार सखाराम सुखदेव यांच्या जाळ्यात हा अजस्त्र मासा अडकला असून, त्याचे वजन तब्बल १५ किलो भरले आहे. हा दुर्मिळ मासा व्यापारी रवी पल्हारे यांना मिळाला असून, स्थानिक बाजारपेठेत या माशाला मागणी आहे. गोड पाण्यात वाढणारा ‘शिलवर’ मासा हा अजिबात काटा नसलेला, चवदार, लुसलुशीत आणि मऊ मांसासाठी प्रसिद्ध आहे. चोखंदळ खाद्यप्रेमींमध्ये या माशाला नेहमीच पहिली पसंती असते. सध्या बाजारात या माशाला ४०० रुपये प्रतिकिलो इतका विक्रमी भाव मिळत आहे. मासा बाजारात येताच काही ग्राहकांनी तो खरेदी करण्यासाठी ॲडव्हान्स बुकिंगही नोंदवली होती. मच्छीमारांचे स्थानिक नेते बजरंग लिंबोरे यांनी सांगितले की, “जायकवाडी धरण परिसरात पूर्वी ‘शिलवर’ प्रजातीचे मासे मुबलक प्रमाणात आढळायचे. मात्र, प्रदूषण, बदलणारे हवामान आणि इतर कारणांमुळे गेल्या काही वर्षांत या माशांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे एका वर्षानंतर वजनाचा शिलवर मासा सापडल्याने मच्छीमार बांधवांमध्ये आनंद आहे. धरणाच्या गोड पाण्यात आढळणारा आणि अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा ‘शिलवर’ हा गावरान एका वर्षानंतर मच्छीमारांच्या जाळ्यात सापडला आहे. हा मासा अजिबात काटा नसलेला, अत्यंत चवदार, लुसलुशीत आणि मऊ मांसासाठी प्रसिद्ध आहे. वर्षभरानंतर मच्छिमाराच्या जाळ्यात हा मासा सापडला असून, खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. गोड पाण्यामध्येच आढळतो ‘शिलवर’ धरणात मत्स्यबीज टाकण्यात यावे : Ã गेल्या अनेक वर्षांपासून जायकवाडी धरणाच्या जलाशयात मत्स्य व्यवसाय विभागाकडून अधिकृतपणे मत्स्यबीज सोडण्यात आलेले नाही. परिणामी, धरणातील माशांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली असून मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. – बजंरग लिंबोरे अध्यक्ष, जायकवाडी मच्छीमार बचाव संघर्ष समिती
Source link
जायकवाडीत ‘शिलवर’ मासा आढळला:15 किलो वजन, तब्बल वर्षभरानंतर आढळला दुर्मिळ मासा