Headlines

मंजरपूर शिवारामधील खून प्रकरणामध्ये 5 जण अटकेत:डोळ्यात मिरची पावडर टाकून सख्खा चुलत भावानेच चाकूने भोसकले‎




मंजरपूर शिवारात जुन्या वहिवाट ‎‎रस्त्यावरून दोन सख्ख्या चुलत ‎‎भावांमध्ये शुक्रवारी वाद उफाळून‎आला. या वादाचे रूपांतर तुंबळ ‎‎हाणामारीत झाले आणि एकाचा‎चाकूने भोसकून खून करण्यात‎आला. या प्रकरणी शिल्लेगाव‎ठाण्यात सात जणांवर खुनाचा गुन्हा ‎‎दाखल असून, पाच आरोपींना‎अटक केल्याची माहिती वरिष्ठ‎निरीक्षक सलीम चाऊस यांनी दिली.‎ सतीश बोल्डे यांच्या तक्रारीनुसार‎रघुनाथ बोल्डे, सागर बोल्डे,‎शोभाबाई बोल्डे, दौलत बोल्डे,‎योगेश बोल्डे, सेजल कामठे, आरती‎जाधव यांच्यावर गुन्हा दाखल आहे.‎ आरोपींना सुनावली ‎पोलिस कोठडी‎ पाचही आरोपींना शनिवारी गंगापूर‎न्यायालयात हजर केले असता,‎न्यायालयाने चार दिवसांची पोलीस‎कोठडी सुनावली आहे, अशी‎माहिती पोलिस कर्मचारी हनुमंत‎सातपुते यांनी दिली. किसन बोल्डे यांच्या मृतदेहाचे‎संभाजीनगर येथील घाटी‎रुग्णालयात शवविच्छेदन करून‎शनिवारी दुपारी शिल्लेगाव येथील‎शेतवस्तीवर पोलिस बंदोबस्तात‎अंत्यसंस्कार करण्यात आले.‎ खुन प्रकरणातील मृतावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.‎‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *