Headlines

राजमाता जिजाऊ नदीघाटाचा मार्ग मोकळा; अतिक्रमण हटवले जाणार:विकास परियोजनेंतर्गत गोदावरी नदीकाठाचे होणार सुशोभीकरण‎



पैठण शहरातील गोदावरी नदीकाठाचा विकास साधण्यासाठी प्रस्तावित असलेल्या ‘राजमाता जिजाऊ नदीघाट विकास परियोजना’ अंतर्गत घाट बांधकामाच्या कामाला आता गती मिळण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जागेवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई येत्या सोमवा

.

राजमाता जिजाऊ घाटास मार्च २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाची तत्त्वतः मान्यता मिळाली होती. त्यानंतर मार्च २०२३ मध्ये जिल्हाधिकारी स्तरावरून प्रशासकीय मान्यता देण्यात आली. पुढे निविदा प्रक्रिया पूर्ण करून छत्रपती संभाजीनगर येथील ठेकेदारास कामाचा कार्यारंभ आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मार्च २०२४ मध्ये देण्यात आला आहे.

प्रस्तावित घाटाचे बांधकाम पैठण शहरातील नाथ पालखी मार्गाच्या पाठीमागील बाजूस गोदावरी नदीकाठी करण्यात येणार आहे. मात्र संबंधित जागेवर अतिक्रमण असल्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकली नव्हती. सदर जागा महसूल विभागाच्या अखत्यारित असल्याने मागील वर्षी तहसील कार्यालयाकडून अतिक्रमण हटविण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही अतिक्रमणधारकांनी जिल्हा सत्र न्यायालय, छत्रपती संभाजीनगर येथे धाव घेत स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र न्यायालयाने संबंधित दावा नामंजूर केल्याने आता प्रशासनाकडून अतिक्रमण हटविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. यामुळे येत्या सोमवारी येथील अतिक्रमणे काढली जाणार आहेत.

विविध सुविधांसह घाट उभारण्यात येणार राजमाता जिजाऊ नदीघाट विकास परियोजनेअंतर्गत गोदावरी नदीकाठावर भव्य राजमाता जिजाऊ नदीघाट विविध संरक्षणात्मक व पर्यटनविषयक सुविधांसह उभारण्यात येणार आहेत. यामध्ये संरक्षण भिंत, प्रवाह बंधारे, प्रदर्शन दालने, खुले रंगमंच, मेडिटेशन सेंटर, फूड स्टॉल्स, गोदावरी नदीकाठालगत पादचारी मार्ग, रंगमंच, कारंजे, चबुतरे, व्यायामशाळा, सायकल ट्रॅक, सायकल स्टँड तसेच सार्वजनिक स्वच्छतागृह आदी कामांचा समावेश असणार असल्याची माहिती अभियंता राजेंद्र बोरकर यांनी दिली.

नागरिकांनी सहकार्य करावे Ãया प्रकल्पामुळे पैठणच्या पर्यटन विकासाला चालना मिळण्यासोबतच गोदावरी नदीकाठाचे सुशोभीकरण होणार आहे, नागरिकांनी मी पैठणकर म्हणून विकास कामात सहकार्य करणे आवश्यक आहे. -विलास भुमरे, आमदार पैठण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *