Headlines

जायकवाडी धरणावर ‘चित्रबलाक’ पक्ष्यांचे आगमन:पावसाळ्याच्या आगमनानंतर देखण्या जलपक्ष्यांचा किलबिलाट सुरू‎




पावसाळ्याच्या आगमनानंतर जायकवाडी धरणाचा परिसर पुन्हा एकदा जलपक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजू लागला आहे. यंदाच्या मोसमात नाथसागराच्या जलाशयावर मोठ्या संख्येने ‘चित्रबलाक’ (पेंटेड स्ट्रोक) पक्ष्यांनी मुक्काम ठोकला आहे. उथळ पाण्यात थव्याने संचार करणारे आणि आपल्या देखण्या गुलाबी छटांच्या पंखांनी संपूर्ण आसमंत उजळवून टाकणारे हे पक्षी सध्या पर्यटक आणि पक्षिप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरत आहेत. चित्रबलाकाचे स्थानिक नाव पेंटेड स्ट्रोक असे असून, शास्त्रीय नाव मायसटेरिया ल्युकोफाला आहे. या पक्ष्याचा मुख्य अधिवास नद्या, तलाव, धरणे आणि पाणथळ क्षेत्रात असून, प्रमुख खाद्य मासे, बेडूक, खेकडे व इतर लहान जलचर आहेत. हा पक्षी पांढरे शरीर, काळे-पांढरे पंख, शेपटीवर गुलाबी छटा, लांब पिवळी वाकडी चोच आणि थव्याने विहार करणारा देखणा जलपक्षी आहे. ^जायकवाडी पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जलपक्षी अधिवासांपैकी एक मानले जाते. दरवर्षी पावसाळा आणि हिवाळ्यात येथे देश-विदेशातील विविध स्थलांतरित व स्थानिक पक्ष्यांचे आगमन होते. सध्या चित्रबलाकांसह बगळे, करकोचे, विविध प्रकारची बदके आणि इतर जलपक्ष्यांच्या उपस्थितीमुळे हा परिसर जैवविविधतेचा समृद्ध खजिना बनला आहे. – सुनील पायघन, पक्षिमित्र चित्रबलाकाची ओळख त्याच्या पांढऱ्या शरीरावर उठून दिसणारे काळे-पांढरे पंख, शेपटीजवळील आकर्षक गुलाबी छटा आणि लांब, पिवळसर व किंचित वाकड्या चोचीमुळे सहज पटते. उथळ पाण्यात आपली चोच बुडवून मासे, बेडूक, खेकडे व इतर लहान जलचर अत्यंत चपळाईने पकडणे ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण शिकार पद्धत आहे. जलाशयातील विस्तीर्ण पाणथळ क्षेत्र, खाद्यसाखळी आणि सुरक्षित पर्यावरण यामुळे चित्रबलाकांसाठी जायकवाडी हे अनुकूल ठिकाण ठरले आहे. मात्र, या देखण्या पक्ष्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या अधिवासातील वाढता मानवी हस्तक्षेप कमी करणे याची दक्षता घेणे आता काळाची गरज बनली आहे, असे आवाहनही पायघन यांनी केले आहे. शरीरावर काळे-पांढरे पंख धरण जैवविविधतेचा आहे समृद्ध खजिना



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *