Headlines

10 सेकंदांत 6 जणांचा जीव गेला:गोंदियात ट्रक-SUVच्या भीषण अपघाताने हाहाकार




गोंदिया जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या भीषण रस्ते अपघातात तीन वर्षांच्या चिमुकल्यासह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या SUV कारला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की काही क्षणांतच आनंदाने प्रवास करणाऱ्या मजुरांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. कामासाठी जात असताना काळाचा घाला मृत आणि जखमी झालेले सर्वजण मजूर होते. ते मध्य प्रदेशातील बालाघाट येथून तेलंगणातील करीमनगर येथे कामासाठी जात होते. मात्र, गोंदियाजवळ त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आणि प्रवासातच सहा जणांचा जीव गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात गोंदिया जिल्हा मुख्यालयापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या नागरा गावाजवळ झाला. समोरून येणाऱ्या SUV कारला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की SUV कारचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर घटनास्थळी हाहाकार अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. तीन वर्षांच्या चिमुकल्यासह सहा जणांचा मृत्यू या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची ओळख पुढीलप्रमाणे झाली आहे. किरण संतोष वैद्य (26), संतोष मात्रे (38), सुशीला मात्रे (35), रूपसेन तेजलाल सत्याकर (35), ज्योती रूपसेन सत्याकर (32), आरुष मात्रे (वय 3). मृतांमध्ये तीन वर्षांच्या आरुष या चिमुकल्याचाही समावेश असल्याने ही घटना अधिक हृदयद्रावक ठरली आहे. मृत झालेले सर्वजण मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील किरनापूर तहसीलमधील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल दरम्यान, पोलिसांनी ट्रक चालक मोहसिन खान (32) याच्याविरोधात निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपघात नेमका कसा घडला, याचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. हेही वाचा… पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठी सुरक्षा त्रुटी:बनावट PMO अधिकारी आणि सशस्त्र अंगरक्षकाला अटक मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ (NMACC) परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित कार्यक्रमापूर्वी सुरक्षेतील एका मोठ्या त्रुटीमुळे खळबळ उडाली आहे. कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही स्वतःला पंतप्रधान कार्यालयाचा (PMO) वरिष्ठ अधिकारी सांगणारा एक भामटा आणि त्याच्या सशस्त्र अंगरक्षकाला मुंबई पोलिसांनी कार्यक्रमस्थळावरून शिताफीने ताब्यात घेतले आहे. सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *