Headlines

टॅक्स ऑडिट आणि आयकर रिटर्नच्या मुदतवाढीसाठी ‘कॅट’चे केंद्र सरकारकडे निवेदन:2 महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी, प्रदेश उपाध्यक्ष अनिल नेणवाणी यांची माहिती




कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)च्या वतीने केंद्रीय अर्थमंत्री आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ यांच्याकडे करविषयक मुदतवाढ मिळण्याबाबत अत्यंत महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडेही निवेदन सादर करण्यात आल्याचे कॅटचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल नेनवाणी यांनी सांगितले. यासंदर्भात संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल नेनवाणी यांनी सांगितले की, संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. यामध्ये प्रामुख्याने आयटीआर रिटर्नचा समावेश आहे. त्यानुसार आयटीआर युटिलिटीजमधील तांत्रिक अडचणी आणि टीडीएस, टीसीएस पालनामध्ये येणाऱ्या समस्या लक्षात घेता, टॅक्स ऑडिट आणि आयकर रिटर्न दाखल करण्याची मुदत 2 महिन्यांनी वाढवून मिळावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. सध्या टॅक्स ऑडिट रिपोर्ट सादर करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2026 असून, सदर मुदत वाढवून 30 नोव्हेंबर 2026 करण्याची मागणी करण्यात आली आहे. ऑडिट केसेससाठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2026 वरून वाढवून 31 डिसेंबर 2026 करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. ट्रान्सफर-प्रायसिंग प्रकरणांमधील रिपोर्ट (फॉर्म 3CEB) आणि रिटर्न भरण्याची मुदत अनुक्रमे 31 ऑक्टोबर 2026 आणि 30 नोव्हेंबर 2026 वरून वाढवून 31 डिसेंबर 2026 व 31 जानेवारी 2027 पर्यंत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच देशभरातील लहान आणि मध्यम व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारने या मुदतवाढीवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती कॅटच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला जाणार असल्याचे नेनवाणी यांनी सांगितले. आता शासनाकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयाकडे देशभरातील व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *