Headlines

डीजेच्या आवाजाने एका कानाची 40 टक्के ऐकण्याची क्षमता गेली:गणेशोत्सवात डीजे अन् डॉल्बी साऊंड सिस्टीम बंद करा- गुलाबराव पाटील




माझ्या पुतण्याच्या लग्नात घरचे लग्न असल्याने लोकांनी मला नाचायला सांगितले. पण डीजेच्या प्रचंड आवाजामुळे माझ्या कानात असा काही त्रास झाला की, मी एका कानाने 40 टक्के ऐकूच शकत नाही; तो कान आता रिपेअर होणे शक्य नाही. डीजे आणि डॉल्बी सिस्टीममुळे लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. म्हणूनच येत्या गणेशोत्सवात तरुणांनी डीजे न लावता पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करावा, असे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, सण-उत्सव हे आनंदासाठी असतात, कोणाचे आरोग्य धोक्यात घालण्यासाठी नाहीत. प्रचंड आवाजामुळे कानाचे पडदे फाटणे, हृदयाची धडधड वाढणे असे गंभीर आजार उद्भवतात. तरुणांनी या धोक्याचे गांभीर्य ओळखून गणेशोत्सवात डीजेऐवजी ढोल-ताशा आणि पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले तर ते समाजासाठी आणि आरोग्यासाठी उत्तम ठरेल. राज ठाकरेंनंतर भिडेंचीही डीजेवर आक्रमक भूमिका दहीहंडी हा हिंदूंच्या संस्कृतीशी आणि धार्मिक परंपरेशी जोडलेला सण असल्याचे सांगत, त्यामध्ये महिलांचे नृत्य आयोजित करणे योग्य नाही, असे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हटले आहे. त्याचवेळी डीजे आणि डॉल्बी हिंदू सणांमधून पूर्णपणे हद्दपार करावे असेही त्यांनी म्हटले आहे. हिंदू सणांमध्ये महिलांना नाचवणे योग्य नाही. दहीहंडीच्या कार्यक्रमात डान्सर नाचवणारे देशद्रोही आहेत.राज ठाकरे यांनी उत्सवांमध्ये मोठ्या आवाजाच्या साऊंड सिस्टीमचा वापर, लेझर लाईट आणि महिलांना व्यासपीठावर नाचवण्याच्या प्रकारावर प्रश्न उपस्थित केले होते. महाराष्ट्राच्या सण-उत्सवांमध्ये इतर राज्यांतील संस्कृतीचे अनुकरण करण्याऐवजी महाराष्ट्राच्या परंपरेनुसार उत्सव साजरे झाले पाहिजेत, अशी त्यांची भूमिका होती. नागपुरात डीजे बंदीच्या कारवाईवरून विहिंप आक्रमक दुसरीकडे नागपुरात विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) शोभायात्रेत डीजे बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी बजावलेल्या नोटीस आणि दाखल केलेल्या गुन्ह्यांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. या कारवाईमुळे विहिंप आक्रमक झाली आहे. विहिंपने पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे की, सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवांमध्ये डीजे आणि लेझर लाईट्सचा सर्रास वापर झाला, तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र, केवळ हिंदू संघटनांच्या धार्मिक मिरवणुकांवरच हेतुपुरस्सर कारवाई केली जात आहे. हे ही वृत्त वाचा डीजे-दणदणाट संस्कृतीला शोभत नाही:लोकमान्य टिळकांचे खापर पणतू रोहित टिळकांचा मंडळांना स्पष्ट संदेश; उत्सवाला गालबोट लागेल असे काही करू नका!
गणेशोत्सवाची परंपरा सुरू करणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे खापर पणतू रोहित टिळक यांनी आज गणेशोत्सवाचे बदललेले स्वरूप आणि वाढत्या डीजे संस्कृतीवर परखड मत व्यक्त केले. सार्वजनिक गणेशोत्सवाची मूळ संकल्पना समाज संघटन होती, मात्र आजकाल आवाजाची मर्यादा ओलांडून लावले जाणारे डीजे आणि त्यावरील दणदणाट हा आपल्या संस्कृतीला शोभणारा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

डीजे आणि ध्वनीप्रदूषणावर आक्षेप रोहित टिळक यांनी सांगितले की, “सध्या गणेशोत्सवात अत्यंत मोठ्या डेसिबलवर डीजे आणि साऊंड सिस्टीमचा वापर केला जातो, ही प्रथा पूर्णपणे चुकीची पडली आहे. ही कधीच गणेशोत्सवाची मूळ परंपरा नव्हती. या दणदणाटामुळे लोकांच्या तब्येतीला त्रास होतो, घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटतात आणि कानाच्या पडद्यांनाही इजा होते. गणरायाचा उत्सव साजरा करताना अशा प्रकारची भूमिका घेणे अजिबात योग्य नाही.” त्यांनी सर्व मंडळांना स्वतःहून निर्बंध घालून पारंपरिक वाद्यांकडे वळण्याचे आवाहन केले आहे. “केसरीवाड्याने नेहमीच ध्वनीप्रदूषणाची काळजी घेतली आहे आणि कधीही डीजेचा वापर केला नाही,” असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *