![]()
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुणे शहरासह संपूर्ण प्रांतात विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम आयोजित केले. संघाच्या सामाजिक समरसता गतिविधीच्या वतीने स्वयंसेवकांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस आणि पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. पुण्यात सिंहगड रस्त्यावर महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर आणि सिंहगड भाग संघचालक सचिन नागपुरे यांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी भाग कार्यवाह विवेक गद्रे, शरद शिंदे आणि मंगेश पाटील उपस्थित होते. पुणे स्टेशन येथील डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महानगर कार्यवाह सचिन भोसले आणि कसबा भाग संघचालक प्रशांत यादव यांनी पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. पद्मावती येथील बुद्धविहारात नगर संघचालक अविनाश धोमकर यांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन केले. बुद्धविहाराचे प्रमुख सुनील ओव्हाळ यांनी बुद्धवंदना घेतली. वडगाव शेरी येथेही समरसता गतिविधीच्या वतीने डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी कृष्णकांत सातव, युवराज पाटील, गोकुळदास परदेशी आणि उत्तम पाडकोंडे उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात भाग संघचालक सुभाष कदम यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. महानगरासह संपूर्ण प्रांतात संघ स्वयंसेवकांनी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन केले होते. प्रांत संघचालक प्रा. नाना जाधव यांनी अहिल्यानगर येथील अभिवादन कार्यक्रमात सहभाग घेतला. यानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये १२ ते २६ एप्रिल या कालावधीत ‘वही-पेन वाटप’ उपक्रम राबवण्यात येत आहे. स्वयंसेवक डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमापूजनाबरोबरच वही-पेन अर्पण करतील. हे संकलित साहित्य समरसता गतिविधीच्या माध्यमातून सेवावस्त्यांमधील गरजू विद्यार्थ्यांना वितरित केले जाईल. खराडीतील समर्थनगर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने व्याख्यान आणि वही-पेन वाटपाचा उपक्रमही आयोजित करण्यात आला होता.
Source link
डॉ. आंबेडकर जयंती: रा. स्व. संघाने केले अभिवादन:पुणे शहरासह प्रांतात विविध ठिकाणी स्वयंसेवकांचा सहभाग