Headlines

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य:सांगोला-दापोली एसटी बसचा ‘श्रीगणेशा’, शेतकरी आणि पर्यटकांची सोय; दापोली कृषी विद्यापीठाशी सांगोल्याचे नाते होणार घट्ट‎



सांगोला तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी आणि कोकणच्या निसर्गाची ओढ असलेल्या पर्यकांसाठी सांगोला आगाराने एक मोठी भेट दिली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सांगोला ते दापोली या नवीन बस सेवेचा प्रारंभ माजी आमदार दीपक साळुंखे

.

सांगोला तालुक्यातील पर्यटकांना नेहमीच कोकणचा नयनरम्य निसर्ग भुरळ घालत असतो. निसर्ग दर्शनासाठी कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असल्याने, सांगोला-दापोली बसमुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. सांगोला तालुक्यातील शेतकरी आणि पर्यटकांचे दापोली व संपूर्ण कोकणाशी असलेले अतूट नाते ही बस सेवा अधिक दृढ करेल, असेही साळुंखे पाटील यांनी नमूद केले.

या सोहळ्याला भाजपचे शिवाजीराव गायकवाड, माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, सांगोला आगारप्रमुख विकास पोफळे, शहीद अशोक कामटे संघटनेचे अध्यक्ष नीळकंठ शिंदे यांच्यासह आगारातील अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते. याप्रसंगी बसचे चालक आणि वाहकांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. उद्घाटन प्रसंगी बोलताना दीपक साळुंखे म्हणाले की, सांगोला तालुक्यातील शेतकरी हा कष्टाळू आणि नेहमीच नवनवीन प्रयोग करणारा आहे. सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे येथील शेतकऱ्यांनी डाळिंब शेतीतून क्रांती करुन स्वताची प्रगती साधली. आज तालुक्यात डाळिंब, द्राक्षे, आंबा आणि पेरूच्या बागा दिमाखात उभ्या आहेत, यामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे महत्त्वाचे योगदान आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *