![]()
आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी थेट संबंध असल्याच्या संशयावरून आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापुरातील एका स्वयंसेवी संस्थेच्या (एनजीओ) तीन पदाधिकाऱ्यांचे जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. मुंबई दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून, आरोपींचे पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांशी थेट संपर्क असल्याचे तपासात उघड झाले आहे. मुंबई एटीएसने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले. दस्त नोंदणी आणि धर्मादाय नोंदणी प्रक्रियेतील तांत्रिक बाबींचा गैरफायदा घेत या आरोपींनी १० कोटी ५० लाख रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद एटीएसने दिली आहे. संगनमत करून देणगीदार, आयकर विभाग, धर्मादाय कार्यालय, बँका आणि शासनाची दिशाभूल करत ही आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडले गेले आहेत. एका आंतरराष्ट्रीय संस्थेने सोलापुरात ही एनजीओ सुरू करण्यासाठी सुरुवातीला आरोपींना आठ लाख रुपये दिले होते. त्यानंतरच्या काळात विविध छोट्या संस्थांच्या माध्यमातून तब्बल १२६ कोटी ७ लाख ४१ हजार ४५७ रुपयांचा निधी गोळा केल्याची माहिती आता समोर आली आहे. सोलापुरात यापूर्वी झालेल्या दोन मोठ्या कारवाया २०२२ मधील कारवाई : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेवर दहशतवाद्यांना अर्थपुरवठा केल्याचा आणि देशविरोधी कारवायांचा कट रचल्याचा आरोप ठेवून सप्टेंबर २०२२ मध्ये देशभरात ऑपरेशन पीएफआय राबवले होते. यात सोलापूरमधून पीएफआयच्या संशयित कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन दिल्लीला चौकशीसाठी नेण्यात आले होते. देशविघातक कृत्यांसाठी पैसा जमा केल्याचा युक्तिवाद एका संशयित आरोपीने नियमित जामिनासाठी, तर अन्य दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. आरोपींनी देशविघातक कृत्यासाठीच हा पैसा जमा केल्याचा युक्तिवाद सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांनी केला. आरोपींचा पाक नागरिकांशी व आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांशी थेट संपर्क असल्याने त्यांना जामीन मंजूर करू नये, हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळले. आंतरराष्ट्रीय संघटनेच्या ७२ पदाधिकाऱ्यांचे नंबर तपास यंत्रणांनी या एनजीओच्या पदाधिकाऱ्यांचे मोबाइल जप्त केले आहेत. त्यांच्या मोबाइलमधील एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ५० पेक्षा अधिक पाकिस्तानी नागरिकांचे नंबर आढळून आले आहेत. तसेच, संबंधित आंतरराष्ट्रीय संघटनेच्या ७२ हून अधिक पदाधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांकही तपासात निष्पन्न झाले आहेत. या डिजिटल आणि गंभीर पुराव्यांमुळे प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. २०२५ मधील कारवाई पुणे एटीएसने अल-कायदा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून सोलापूरचा आयटी इंजिनिअर जुबेर हंगरगेकर याला अटक केली होती. त्याच्याकडे बॉम्ब आणि मशीनगन बनवण्याची माहिती असलेली कागदपत्रे सापडली होती. त्याने कुंभारी परिसरात काही तरुणांसाठी कार्यक्रम घेतला होता, त्या अनुषंगाने एटीएसकडून काही जणांची चौकशी करण्यात आली होती.
Source link
तिघांचा जामीन फेटाळला:सोलापुरात पकडलेल्या आरोपींच्या मोबाइलमध्ये 50 पाकिस्तानी नंबर, देशविघातक कृत्यांसाठी 10 कोटींचा अपहार