![]()
तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या दहीहंडा गावात पाणीपुरवठा योजना फसली असून नागरिकांवर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. भर उन्हाळ्यात ४५ अंश सेल्सिअस तापमानात महिला, लहान मुले, वृद्ध आणि सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, असे
.
यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले असून प्रशासन नेमकी काय भूमिका घेतली याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. एकीकडे लाखो रुपये खर्च करून पाणी नाल्यात वाहून जात असल्याचा आरोप दहीहंडा विकास मंचच्या वतीने होत असताना, दुसरीकडे गरीब शेतमजूर, शेतकरी व सामान्य कुटुंबांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. ४५ अंश सेल्सियस तापमानात महिलांची, वृद्धांची आणि लहान मुलांची पाण्यासाठी धावपळ होत आहे. गावातील अनेक भागांमध्ये टँकरसमोर पाणी भरण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. टँकरद्वारे पाणी मिळत असताना पाण्यासाठी हाल होत आहेत, असे दहीहंडा विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
लाखो रुपये खर्च करूनही ग्रामस्थ टँकरवर अवलंबून; पाण्यासाठी होते मोठी गर्दी