![]()
तुळजापूर मार्गावरील मालेगाव शिव ते नागोबाचौक या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली असून, सध्या रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पश्चिम महाराष्ट्रातून तुळजापूरकडे जाणाऱ्या भाविका
.
रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, चारचाकी वाहनांसह दुचाकीस्वारांना या मार्गावरून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.
एसटी वाहतुकीवरही परिणाम या मार्गावर वैराग-धाराशिव दरम्यान सकाळी साडेसहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत एसटी बसची ये-जा सुरू असते. मात्र, खराब रस्त्यामुळे एसटी बसच्या देखभाल खर्चात वाढ होण्याबरोबरच प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे काही दिवसांपूर्वी या मार्गावरील एसटी सेवा बंद करण्यात आली होती. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन धाराशिव आगाराने पुन्हा एसटी गाड्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे रस्ता तत्काळ दुररुस्त करावा, अशी मागणी केली आहे.
या रस्त्याच्या दुरवस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित राजकीय पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या हजारो भाविकांसह स्थानिक नागरिक आणि एसटी प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन मालेगाव शिव ते नागोबाचौक रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. रस्ता लवकरात लवकर दुरुस्त न केल्यास रुई आणि मालेगाव येथील नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच या आगोदर वर्तमानपत्रांमध्ये देखील या रस्त्याची बातमी वारंवार प्रसिद्ध करून देखील प्रशासनाला जर जाग येत नसेल? तर दुर्दैव मनाव लागेल.
ठेकेदाराला वारंवार नोटिसा दिल्या मालेगाव ते नागोबा चौक या रस्ता खूप बिकट झाला आहे. हा रस्ता साडेसात किलोमीटर लांबीचा आहे. या रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराला वारंवार नोटिसा आम्ही दिल्या आहेत. परंतु ठेकेदारांना रस्ता दुरुस्त न केल्यामुळे आम्ही दुसऱ्याला टेंडर देण्याचे प्रक्रिया वरिष्ठ स्तरावर चालू केला आहे. त्यानंतरच दुरुस्त केला जाईल. -विक्रांत चव्हाण, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, बार्शी