![]()
मराठा समाजातील माता-भगिनींबाबत आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्य करून समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत वैराग भागातील सकल मराठा समाजाच्या वतीने नवनाथ वाघमारे यांचा जाहीर निषेध केला. तसेच त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन वैराग पोलिस ठाण्यात देण्यात आले. सदर निवेदनाचा स्वीकार वैरागचे पोलिस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव यांनी केला. नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील माता-भगिनींबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे समाजाच्या भावना तीव्र स्वरूपात दुखावल्या असून, अशा वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. निवेदन देतेवेळी डॉ. कपिल कोरके, वैजिनाथ आदमाने, समाधान पवार, मनोज वाघमारे, अण्णा गाटे महेश पन्हाळे, हरिचंद्र पौळ, बालाजी ढेकळे, शहाजी आगलावे, सतीश करंडे, आरिफ पटेल, सचिन ताटे यांच्यासह सकल मराठा समाजातील तरुण उपस्थित होते. वैरागमध्ये निवेदन देताना मराठा समाज बांधव. या वेळी डॉ. कपिल कोरके म्हणाले, “नवनाथ वाघमारे यांना चोप देणारास दहा लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल,” असे वक्तव्य केल्याचे उपस्थितांनी सांगितले. मात्र, अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी योग्य ती कायदेशीर दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
Source link
मराठा समाजातील मुलींबद्दल वक्तव्य:वैरागमध्ये नवनाथ वाघमारेंविरुद्ध संताप, वाघमारेंना चोप देणाऱ्यास 10 लाख बक्षीस