![]()
नागपंचमीनिमित्त मोहोळ तालुक्यात महिलांनी पारंपरिक पद्धतीने नागदेवतेचे पूजन करून उत्साहात सण साजरा केला. नऊवारी साडी, नथ, सौभाग्याचे अलंकार आणि हातात सौभाग्याचा चुडा परिधान करून महिलांनी भक्तिभावाने नागरायाची पूजा केली. घरातील सुख-शांती, कुटुंबाचे आरो
.
घरोघरी मातीच्या नागोबाची पूजा करून वारुळाला दूध, तूप, पुरणाचे दिंड, पिवळ्या धाग्याचे पौते आणि लाह्या अर्पण करण्यात आल्या. श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्याने मोहोळसह वडवळ येथील श्री नागनाथ महाराज मंदिरासह विविध मंदिरांत सकाळपासून महिलांच्या रांगा लागल्या होत्या.
शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी पारंपरिक झोके बांधण्यात आले होते. झोका खेळण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती. उत्साह एवढा होता की, महिला तहान-भूक विसरून झोक्यांचा आनंद घेत असल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळाले. पारंपरिक गाणी म्हणत महिलांनी एकमेकींसोबत झोके खेळण्याचा आनंद लुटला. यामुळे परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.अनेक ठिकाणी महिलांनी फुगड्यांसह विविध पारंपरिक खेळांमध्येही सहभाग घेतला. नागपंचमीच्या निमित्ताने महिलांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. पारंपरिक संस्कृतीचे जतन करत महिलांनी सणाचा आनंद साजरा केला. यामुळे वातावरण आनंदमय झाले होते.
महिलांनी बालपणीच्या आठवणींना दिला उजाळा पूजन व दर्शनानंतर महिलांनी पारंपरिक झोक्यांचा मनसोक्त आनंद लुटला. ‘उंच माझा झोका गं…’ म्हणत मैत्रिणींसोबत झोके घेत महिलांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी जुन्या मैत्रिणींशी गप्पा मारत सुख-दुःखाच्या आठवणींनाही वाट मोकळी करून दिली.