![]()
महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष उत्तीर्ण होण्यासाठी अतिरिक्त परीक्षेची एक विशेष दया संधी (Mercy Attempt) उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे (MUHS) कुलगुरू डॉ. व्यंकट गिते यांच्या विश
.
आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या, वैयक्तिक अडचणी किंवा इतर अपवादात्मक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना नियमित संधींमध्ये परीक्षा उत्तीर्ण होता आले नव्हते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळावे, त्यांच्यावरील मानसिक ताण हलका व्हावा आणि आर्थिक भार कमी व्हावा, या उद्देशाने विद्यापीठाने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे अतिरिक्त संधी देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यापीठ प्रशासन नेहमीच विद्यार्थ्यांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेण्यास कटिबद्ध असून, कुलगुरूंच्या प्रयत्नांमुळे हा विद्यार्थीहितैषी निर्णय शक्य झाला आहे.
निर्णयाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि अटी:
- 5 प्रयत्नांची संधी: राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नियमानुसार प्रथम वर्षासाठी आधी 4 संधी दिल्या जात होत्या. आता 4 नियमित आणि 1 विशेष ‘दया संधी’ अशा एकूण 5 संधी मिळतील.
- 2019-20 पासूनच्या सर्व बॅचेससाठी लागू: शैक्षणिक वर्ष 2019-20 व 2020-21 या बॅचेसना कोविडमुळे 5 वा प्रयत्न मिळाला होता. मात्र, नवीन निर्णयानुसार 2019-20 च्या बॅचपासून पुढील सर्व बॅचेसमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ही विशेष दया संधी लागू असेल.
- प्रवेश वैध असणे आवश्यक: ज्यांचे प्रथम वर्षाचे 4 प्रयत्न संपले आहेत, त्यांनाही या संधीचा लाभ घेता येईल. मात्र, विद्यार्थ्याचा महाविद्यालयातील किंवा विद्यापीठातील प्रवेश वैध असावा (रद्द झालेला नसावा).
- कालावधीची अट: विद्यार्थ्यांना संपूर्ण एम.बी.बी.एस. (MBBS) अभ्यासक्रम हा इंटर्नशिपसह 10 वर्षांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक राहील.
- एकवेळची विशेष सवलत: ही केवळ एकवेळची (One-time measure) विशेष उपाययोजना असून याचा पायंडा (Precedent) म्हणून वापर करता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयाबाबत नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या अधिकृत संकेतस्थळावर परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, सर्व संबंधित विद्यापीठे व वैद्यकीय महाविद्यालयांना त्यानुसार तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.