![]()
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते येथील अधिकारी-कर्मचारी व नागरिकांना जलसंधारण, व्यसनमुक्ती, पॉश कायदा आणि साक्षरतेची शपथ देण्यात आली. राज्य सरकारने या गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पाण्याचे भविष्यातील दुर्भिक्ष्य लक्षात घेता जलसंधारणाच्या कामांवर भर देण्याचे शासनाने यापूर्वीच जाहिर केले आहे. यासोबतच व्यसनमुक्त समाजनिर्मिती, लहान मुलांचे अत्याचारापासून संरक्षण आणि समाजाला साक्षर करण्यासाठी झटण्याची प्रतिबद्धता हेही शासनाने ठरवले आहे. त्यासाठीच सर्वांना शपथ देण्यात आली. मंत्री भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील विभागीय आयुक्त कार्यालयात स्वातंत्र्य दिनाचा मुख्य प्रशासकीय कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी ही मांडणी केली. विभागीय आयुक्त नयना गुंडे, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त राकेश ओला, जिल्हा पोलिस अधीक्षक निकेतन कदम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ३०८ कोटी रुपयांची शेतकऱ्यांना मदत करण्यात आली. त्यासोबतच जलसंधारणासाठी विविध उपाययोजनाही करण्यात आल्या आहे. येत्या काळातही जलसंधारण आणि शेतकऱ्यांना मदतीवर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी केले. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी ‘जलसंधारण अभियान’ राबवले जाणार आहे. आगामी २१ ऑगस्ट रोजी माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ”जलसंधारण दिन” साजरा करण्यात येणार आहे. त्यासोबतच काही भागातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदतही देण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रातही धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहे. शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्ह्यात पायाभूत सुविधा आणि ग्राम विकास व्हावा म्हणून पांदण रस्त्यांसाठी डीपीसीतून निधी देण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांना वहीवाटीचे रस्ते उपलब्ध करून होणार आहे. चिखलदरा हे परिपूर्ण पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी निधी देण्यात येत आहे. येथील स्कायवॉकचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या विकासात योगदान देणारे अमरावती विमानतळ विस्तारीकरण, नाईट लँडिंग सुविधा आणि पायलट प्रशिक्षण केंद्र उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. तसेच वस्त्रोद्योग विकासासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचेही सांगितले. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश घ्यार, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, पोलिस उपअधीक्षक तयुब युनुस मुजावर, नागरी हक्क संरक्षणच्या पोलिस अधीक्षक अनिता पाटील, पोलिस निरीक्षक अशोक लांडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक अनिल काळे, पोलिस हवालदार प्रशांत भटकर, त्र्यंबक मनोहर, राजेश पांडे, प्रभाकर बोदडे, हेड कॉन्स्टेबल निलेश अंबर्ते, दिपमाला साळुंखे, अतुल कडू, प्रदीप बद्रे, मिलींद बेलसरे, हरीना नेत्रदान समितीचे मनोज राठी, राजेंद्र वर्मा, रामप्रकाश मिश्रा, मुकेश लोहिया, शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविल्याबद्दल सारांश सारडा, गार्गी कुऱ्हाडे, दिया पाटील यांचा सत्कार केला.
Source link
मंत्री भुसे यांच्या हस्ते जलसंधारण, व्यसनमुक्ती अन् साक्षरतेची शपथ:स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात घेतले वचन, अभियानाची दिली माहीती