![]()
‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीने मित्राच्या साथीने प्रियकराची घरात चाकूने गळा चिरून हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी 18 तास मृतदेह घरात ठेवून कारमधून नेत तो कसारा घाटात फेकून दिला. मात्र, गुन्हे शाखा युनिट 1 चे नाझीम पठाण, मुख्तार शेख आणि पथकाने खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून कार चालकाला ताब्यात घेत मृतदेह शोधला. त्याची ओळखही पटवली. वसंत गोरखनाथ सातपुते (40, रा. स्वराज्यनगर, पाथर्डी फाटा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कुठलीही मिसिंग दाखल नसताना हा गंभीर गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. सहायक आयुक्त संदीप मिटके, वरिष्ठ निरीक्षक अंचल मुदगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत सातपुते अचानक बेपत्ता झाला. याबाबत पोलिसांत मिसिंग तक्रार नव्हती. खबऱ्याने माहिती दिली. हसिना शेख व तिचा मित्र साहिल शहा आणि साथीदारांनी कारमधून मृतदेह नेल्याचे त्याने सांगितले. पथकाचे विशाल काठे, प्रशांत मरकड, विशाल देवरे आदींनी कारचालक सरफराज अबरार सय्यद (रा. नानावली) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने कारमधून मृतदेह नेल्याची कबुली दिली. पथकाने कसारा घाटात मृतदेह शोधला. संशयित साहिल रफिक शहा, मोईन मुख्तार शहा या दोघांना ताब्यात घेतले. मद्य-जुगाराचा नाद, प्रेयसीचे पैसे चोरून करायचा मौज मृत सातपुतेला मद्य-जुगाराचा नाद होता. हसिनाचे पैसे चोरी करून तो मौज करायचा. मारहाण-शिविगाळही करत असल्याने हसिना त्रस्त होती. तिने मित्र साहिलला सांगितले, कट रचला. मद्याच्या नशेत असताना वसंतचा गळा चिरून 18 तास मृतदेह घरातच ठेवला. शांत डोक्याने कट रचून मध्यरात्री कामधून कसारा घाटात नेऊन मृतदेह फेकला. यानंतर मुंबई फिरले. रक्ताचे डाग धुवून चाकू फेकून देत पुरावे नष्ट केले.
Source link
नाशिकमध्ये प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा गळा चिरला:18 तासांनी मृतदेह घाटात फेकला; दाेघे ताब्यात, पोलिसांनी कसारा येथून शाेधला मृतदेह