Headlines

दर्यापूर वकील संघाला मिळाली पहिली महिला सचिव:ॲड. अनुराधा गोमाशे यांची ऐतिहासिक निवड, न्यायव्यवस्थेत नवे बळ




दर्यापूर वकील संघाच्या इतिहासात प्रथमच एका महिलेच्या हाती सचिवपदाची जबाबदारी आली आहे. ॲड. अनुराधा गोमाशे यांची वकील संघाच्या सचिवपदी निवड झाली असून, त्या या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या वकील संघाच्या निवडणुकीत ॲड. अनुराधा गोमाशे यांनी सचिव पदासाठी भरघोस मतांनी विजय मिळवला. त्यांच्या या निवडीमुळे दर्यापूर शहरासाठी एक नवा अध्याय सुरू झाला असून, महिला वकिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. न्यायव्यवस्थेतील महिलांच्या नेतृत्वाला यातून नवे बळ मिळाले आहे. त्यांच्या या ऐतिहासिक निवडीबद्दल वकील संघातील पदाधिकारी, ज्येष्ठ विधिज्ञ, सहकारी आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी बोलताना ॲड. गोमाशे यांनी वकील संघाच्या सर्व सदस्यांचा विश्वास सार्थ ठरवत, संघाच्या विकासासाठी, महिला वकिलांच्या सहभागवृद्धीसाठी आणि वकिलांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची ग्वाही दिली. त्यांनी आपल्या यशामागे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. राजाभाऊ गोमाशे आणि ॲड. अनुप गोमाशे यांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या निवडीमुळे वकील संघाच्या कार्यात नव्या उमेदीने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून काम होईल, असा विश्वास अनेक वकिलांनी व्यक्त केला. या निवडणुकीचे कामकाज मुख्य निवडणूक अधिकारी अधिवक्ता आशिष बावनेर यांनी चोखपणे पार पाडले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *