![]()
प्रतिनिधी|अहिल्यानगर येथील ज्ञानसंपदा शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. या वर्षीच्या निकालात गायकवाड ध्रुव याने ९७.८ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. गणित व विज्ञान विषयात प्रत्येकी १०० पैकी १०० गुण मिळवले. वेदांत बर्वे याने ९६.२% गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला. ऋषभ वांडेकर याने ९६ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक तर नंदिनी खळेकर हिने ९५.६ टक्के गुण मिळवत चौथा क्रमांक पटकावला. भार्गवी परदेशी हिने ९५.४ टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळवला. यावर्षी एकूण ७९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे २४ विद्यार्थी पात्र ठरले. तसेच ८० ते ८९ टक्क्यांच्या दरम्यान ३६ विद्यार्थी, ७० ते ७९ टक्क्यांच्या दरम्यान १४ विद्यार्थी आणि ६० ते ६९ टक्क्यांच्या दरम्यान पाच विद्यार्थी पात्र ठरले. शाळेच्या सरासरी गुणांच्या टक्केवारीतही यंदा वाढ झाली असून ती ८५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रवीण बजाज, उपाध्यक्ष मिलिंद गंधे, मानद सचिव अरुण कुलकर्णी, खजिनदार अविनाश बोपर्डीकर, स्कूल कमिटी चेअरमन कारभारी भिंगारे, श्रीहरी टिपूगडे, सुमित सोनवणे, विनोद बजाज, अक्षय वाघमोडे, डॉ. सुनिता भागवत, मुख्याध्यापिका शिवांजली अकोलकर यांनी यशस्वी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांचे अभिनंदन केले.
Source link
दहावी परीक्षेमध्ये ज्ञानसंपदा शाळेचा ध्रुव गायकवाड प्रथम:गणित व विज्ञान विषयात प्रत्येकी १०० पैकी १०० गुण