Headlines

दिलासादायक:अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 44,648 शेतकऱ्यांना मिळणार लाभ




महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २ जून २०२६ रोजी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६’ ची ऐतिहासिक घोषणा केली आहे. या शासन निर्णयाच्या आधारे लातूर जिल्ह्यातील तब्बल ४४,६४८ पात्र शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती आणि अर्थसहाय्याचा थेट लाभ मिळणार आहे. मात्र, जो शेतकरी योजनेच्या निकषात बसत नाही त्याला शासन स्तरावरून कमी करण्यात येणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालय, सहकारी संस्था, लातूर यांच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील एकूण ४५,४६१ कर्ज खात्यांची सखोल तपासणी पूर्ण झाली असून, त्यातील ९८.२१% (४४,६४८ खाती) डेटा अपलोडिंगचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित केवळ ८१३ कर्ज खात्यांची प्रक्रिया तंत्रीत अडचणीमुळे किंवा मयत व्यक्ती असल्याने पूर्ण झाली नाहीत. लातूर जिल्ह्यातील ४४,६४८ बाधित व गरजू शेतकऱ्यांना या कर्जमुक्तीमुळे मोठा दिलासा मिळणार असून, थकीत कर्जाच्या दुष्टचक्रातून मुक्त होऊन त्यांना आगामी हंगामासाठी बँकांकडून नव्याने पीक कर्ज मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (जिमस बँक) आणि प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांच्या माध्यमातून वितरीत केलेल्या कर्ज खात्यांची काटेकोर तपासणी करून हा प्रगती अहवाल तयार करण्यात आला आहे. . एकूण विकास संस्था: ५८४ . एकूण कर्ज खाती: ४५,४६१ . तपासणी पूर्ण झालेली खाती: ४५,४६१ . योजनेंतर्गत पात्र डेटा अपलोड: ४४,६४८ (९८.२१%) लातूर जिल्ह्यातील सर्व १० तालुक्यांमध्ये (लातूर, रेणापूर, औसा, निलंगा, शिरूर अनंतपाळ, देवणी, उदगीर, जळकोट, अहमदपूर आणि चाकूर) बँकिंग व सहकार तपासणीचे काम १००% पूर्ण झाले आहे. {२ लाखांपर्यंत कर्जमुक्ती: ज्या शेतकऱ्यांचे ०१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत आहे आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड झालेले नाही, अशा शेतकऱ्यांना कमाल २ लाखांपर्यंत कर्जमाफी दिली जाईल. { एकवेळ समझोता : ज्यांचे थकीत कर्ज ₹२ लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांनी ₹२ लाखांवरील उर्वरित रक्कम बँकेत जमा केल्यास त्यांना ₹२ लाखांचा ”ओटीएस” अंतर्गत लाभ दिला जाईल. यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. {५० हजार प्रोत्साहनपर लाभ: जे शेतकरी कर्जाची वेळेवर व नियमित परतफेड करतात, अशा शिस्तप्रिय शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून कमाल ₹५०,०००/- पर्यंतचा लाभ मिळणार. {पूर्वीच्या लाभार्थींसाठी विशेष तरतूद: ज्यांना २०१९ च्या महात्मा जोतिराव फुले योजनेचा लाभ मिळाला होता, त्यांच्यासाठी ₹५०,००० पर्यंतच्या थकबाकीवर कर्जमुक्तीची मर्यादा निश्चित केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *