Headlines

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:रूट निश्चितीमध्ये तांत्रिक अडचण; बेलोऱ्याहून ‘नाइट लॅंडिंग’ रखडले




बेलोरा विमानतळावरून रात्रीचे लॅंडिंग व टेकऑफ ‘रूट’ निश्चिती करण्यात तांत्रिक अडचण असल्याने रखडले आहे. रात्री विमानोड्डाणासाठी बेलोरा विमानतळासाठी नेमकी कोणत्या मार्गाने विमानसेवा द्यावी, यासाठी आपल्याकडे कोणते विमान उपलब्ध आहे. याबाबत एअर इंडियाने डीजीसीएला कळवले आहे. तसेच रात्री थेट मुंबई ते बेलोरा व बेलोरा ते मुंबई विमानसेवा देण्यात ज्या तांत्रिक अडचणी आहेत, त्याबाबतही माहिती दिली आहे. यात एअर इंडियाला डीजीसीएने सुलभ पर्याय सुचवण्याबाबत सांगितले आहे. यातच सध्या वेळ जात असल्याचे सुत्राने सांगितले. बेलोरा विमानतळासाठी मार्ग निश्चित करणे एअर इंडियासाठी सुलभ नसून त्यांना एकतर इतर विमानतळावरून बेलोरा विमानतळाकडे त्यांचे ७२ आसनी विमान वळवावे लागेल किंवा थेट विमानसेवेसाठी अतिरिक्त विमान राखीव ठेवावे लागणार आहे. बेलोराहून रात्रीच्या विमानात प्रवासी मिळतील काय, आठवड्यातून दोन ते तीन दिवस रात्री विमानसेवा ठेवली तर अपेक्षित उत्पन्न होईल काय की, दिवसाची फेरी न ठेवता मग रात्रीच विमानसेवा द्यावी काय, अशा अनेक तांत्रिक अडचणी आहेत. रात्री विमानोड्डाणासाठी आवश्यक डॉपलर व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ओमनी डायरेक्शनल रेंज (डीव्हीओआर) यंत्रणा यशस्वीपणे इन्स्टॉल झाली असून रात्री लॅण्डींग व टेक ऑफकरिता ज्या रूटने विमान येईल, त्याबाबत डीजीसीए व एअर इंडियात एकमत होईनासे झाल्यामुळे बेलोरा विमानतळावरील ‘नाईट लॅण्डींग’ सहज होईल, असे दिसत नाही. यातून सुमध्य काढून नाईट लॅण्डींग सुरू झाले तर जमेची बाजू ठरेल. अनेक तांत्रिक अडचणी बेलोराहून रात्रीच्या विमानात प्रवासी मिळतील काय, आठवड्यातून दोन ते तीन दिवस रात्री विमानसेवा ठेवली तर अपेक्षित उत्पन्न होईल काय की, अशा अडचणी आता समोर येत आहेत. कोणत्याही विमानतळावर नाईट लॅण्डींग व टेकऑफ करायचे असेल तर ते रात्री विमानोड्डाणासह विमान उतरवण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित काहे की नाही, याबाबत खातरजमा करूनच डीजीसीए परवाना देत असते. त्याचप्रमाणे ज्या कंपनीचे विमान नाईट लॅण्डींग करणार असेल त्या कंपनीलाही परवानगी घ्यावी लागते. सध्या एअर इंडियाची विमानसेवा बेलोरा विमानतळावर सुरू असून त्यांच्याकडे दिवसाच विमानोड्डाणाचा परवाना आहे. आता त्यांच्यासह बेलोरा विमानतळ प्रशासनाला नाईट लॅण्डींग व टेक ऑफचा परवाना डीजीसीए मिळायचा आहे. तो मिळाल्यानंतरच नाईट लॅण्डींगचा मार्ग सुकर होणार आहे. नाइट लॅंडिंगसाठीही लागतो कंपनीचा परवाना धावपट्टीवर दिशादर्शक लाईट्सही लागले रात्री विमानाला धावपट्टीवर उतरण्यासाठी विशेष प्रकाश देणारे तसेच विमानातील यंत्रणेला ते लाईट्स सहज दिसतील अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. कारण, रात्री धावपट्टी ही या लाईट्सच्या आधारेच विमानांना दिसत असते. डीव्हीओआर यंत्रणाही विमानाला सुरक्षित लॅण्डींगसाठी पूर्ण सहकार्य करीत असते. त्यामुळे धावपट्टीवर योग्यप्रकारे विमान उतरते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *