![]()
माता रुक्मिणीचे माहेर असलेले कौंडण्यपूर हे विदर्भातील पंढरपूर म्हणून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी (दि. २५) पहाटे ६ वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा होणार असून, दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने हजारो भाविक दर्शनासाठी कौंडण्यपुरात दाखल होणार आहे. दरम्यान या सोहळ्यामुळे अवघ्या कौंडण्यपूरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. बसची तत्काळ व्यवस्था कौंडण्यपुरसाठी अतिरिक्त एसटी बसची सध्या स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली नाही. मात्र बसस्थानकावर कौंडण्यपूरकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्यास आणि मागणी झाल्यास तातडीने अतिरिक्त बस उपलब्ध करून देण्यात येईल. अशी माहीती एसटीचे जिल्हा वाहतूक अधिकारी (डिटीओ) संदीप रायलवार यांनी दिली आहे.
Source link
कौंडण्यपुरात आज भाविकांची गर्दी:पहाटे 6 वाजता महापूजा : गर्दी लक्षात घेता बंदोबस्तात केली वाढ