मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्षश्रेष्ठी दिल्लीत महत्त्वाची जबाबदारी देणार असल्याच्या चर्चांना त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. पंढरपूर दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी, “मला महाराष्ट्रातच राहायचं आहे आणि दे
.
यावेळी अमृता फडणवीस यांनी NEET पेपरफुटी प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू असलेले आंदोलन योग्य असल्याचे सांगत त्यांनी, सरकारने या प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्ट, कठोर शिक्षा आणि भविष्यात पेपरफुटी रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू केल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांची मेहनत वाया जाऊ नये आणि त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठी सरकार गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर स्वागतार्ह भूमिका
रविवारी मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर संयुक्त मोर्चाची हाक दिली आहे. या राजकीय समीकरणावर भाष्य करताना अमृता फडणवीस यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली. त्या म्हणाल्या, “इतके दिवस वेगळे असलेले ठाकरे बंधू आता एकत्र येऊन काहीतरी करत आहेत, ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. त्यांच्या या एकत्र येण्याकडे आपण सर्वांनी एका सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.”
‘नीट’ आंदोलनाला पाठिंबा अन् सरकारची बाजू
जंतरमंतर आणि राज्यभरात सुरू असलेल्या ‘नीट’ विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरही त्यांनी मत व्यक्त केले. जोपर्यंत हे आंदोलन केवळ ‘नीट’ पेपरफुटीच्या मुद्द्यावर आहे, तोपर्यंत ते पूर्णपणे योग्य असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, विद्यार्थ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. “सरकार पडद्यामागे यावर गांभीर्याने काम करत होते, ज्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. या प्रकरणासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करणे आणि शिक्षेच्या तरतुदी कठोर करणे यांसारखे मोठे बदल केले जात आहेत. विद्यार्थ्यांची अपार मेहनत वाया जाऊ नये आणि त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये, याची पूर्ण काळजी सरकार घेत आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आंदोलक मुलींशी गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
जंतरमंतर आणि इतर ठिकाणच्या आंदोलनांमध्ये काही समाजकंटकांनी किंवा पोलिसांकडून आंदोलक मुलींशी गैरवर्तन झाल्याचे व्हिडिओ समोर आले होते. यावर अमृता फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “आंदोलनादरम्यान झालेला तो प्रकार अत्यंत निंदनीय आणि काळाकुट्ट क्षण होता. जर आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही मुलीसोबत गैरवर्तन झाले असेल, तर त्या दोषींवर निश्चितपणे आणि कठोर कारवाई झालीच पाहिजे,” अशी स्पष्ट मागणी त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा..
…आणिक दर्शन विठोबाचे!:पंढरपुरात पहाटे 3 वा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा; सलग 20 वर्षे वारी करणाऱ्या धाराशिवच्या माने दांपत्याला पूजेचा मान

श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस व मानाचे वारकरी दांपत्य यांच्या हस्ते परंपरेनुसार ही पूजा झाली. यंदा मुख्यमंत्र्यांसमवेत पूजा करण्याचा मान धाराशिव जिल्ह्यातील गौरगांवच्या बाबासाहेब माने (वय ७०) व प्रभावती माने (वय ६८) या वारकरी दांपत्यास मिळाला. शेतकरी असलेले माने दांपत्य गेल्या २० वर्षांपासून पंढरपूरची वारी करते. सविस्तर वाचा