![]()
अमरावती जिल्ह्यात दुष्काळामुळे चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे धास्तावलेल्या मेंढपाळ बांधवांनी शासनाकडे पशुधनासाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी गुरुवारी त्यांनी इर्विन चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. मेंढपाळ समाजाचे सेवक डॉ. अर्जुन महानर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चाचा समारोप झाला. यावेळी मेंढपाळांच्या प्रतिनिधीमंडळाने विभागीय आयुक्त नयना गुंडे यांना निवेदनाद्वारे मोफत पाणी आणि चारा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावेळी परप्रांतीय मेंढपाळांवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली. प्रशासनाने मोर्चेकऱ्यांना सांगितले की, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने यापूर्वीच परप्रांतीय मेंढपाळांवर बंदीचा आदेश काढला आहे. तसेच, जिल्ह्यातील चारा इतर जिल्ह्यांत पाठवण्यावरही बंदी आहे.
Source link
दुष्काळात चारा, पाण्याची मागणी: मेंढपाळांचा आयुक्तालयावर मोर्चा:डॉ. अर्जुन महानर यांच्या नेतृत्वात निवेदन सादर, परप्रांतीय मेंढपाळांवर बंदीची मागणी