![]()
सरला बेटावर सुरू असलेल्या 179 व्या अखंड हरिनाम सप्ताहाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.. यावेळी महंत रामगिरी महाराजांना मिळणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्यांचा मुद्दा उपस्थित झाला. धमकी देणाऱ्यांना फडणवीस यांनी थेट इशारा देत, “धमकी देण्याचं काम केलं तर नेस्तनाबूत करून टाकू,” असे ठणकावले. रामगिरी महाराजांच्या केसालाही धक्का लागू देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीबाबतही सरकारच्या निर्णयांची माहिती दिली. आतापर्यंत साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा उपक्रम सुरू असून, दर पंधरा दिवसांनी नवीन यादी तयार करून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जात असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. धमकी देणाऱ्यांना फडणवीसांचा इशारा सरला बेटावर सुरू असलेल्या श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताहाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी महंत रामगिरी महाराजांना मिळणाऱ्या धमक्यांचा मुद्दा उपस्थित झाला. फडणवीस यांनी धमकी देणाऱ्यांना थेट इशारा देत, “धमकी देण्याचं काम केलं तर नेस्तनाबूत करून टाकू. आम्ही केसालाही धक्का लागू देणार नाही,” असे ठणकावून सांगितले. रामगिरी महाराजांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या असून, त्यांच्या काही वक्तव्यांवरून गुन्हेही दाखल झाले आहेत.फडणवीस यांनी पुढे आपल्या भूमिकेला जनतेचे पाठबळ असल्याचे सांगितले. आपण निवडलेल्या सन्मार्गावरून कोणतीही शक्ती आपल्याला थांबवू शकत नाही, असा सूचक संदेशही त्यांनी दिला. संत परंपरेमुळे भारताची संस्कृती टिकली हरिनाम सप्ताहाचे महत्त्व सांगताना फडणवीस यांनी भारताच्या संत परंपरेचे कौतुक केले. भारतावर अनेक आक्रमणे झाली, किल्ले जिंकले गेले आणि मंदिरे उद्ध्वस्त झाली; मात्र भारतीयांच्या मनातील ईश्वराचे स्थान कोणी बदलू शकले नाही, असे ते म्हणाले. वारकरी, हरिनाम आणि सनातन परंपरेमुळे भारताची संस्कृती आणि विचारांची परंपरा अखंड राहिली. हरिनाम सप्ताहामुळे समाजातील जाती-पातीचे भेद दूर होऊन सर्वजण एकत्र येतात आणि एकमेकांमध्ये विठ्ठल पाहतात, असेही फडणवीस यांनी सांगितले. सरला बेटाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून, पुढील काळात हे ठिकाण महाराष्ट्रातील भाविकांसाठी आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र बनेल, असे त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी कर्जमाफी आणि ‘लाडकी बहीण’ योजनेवरही भाष्य फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख करत साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाल्याचे सांगितले. 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा उपक्रम सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासह थकीत वीजबिलांबाबत सरकार निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संतांच्या संरक्षणासाठी सरकार खंबीर असल्याचे स्पष्ट केले. तसेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना बंद होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम देत, “कोणी कितीही आटापिटा केला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही,” असे शिंदे यांनी ठणकावून सांगितले.
Source link
‘धमकी दिली तर नेस्तनाबूत करू’:रामगिरी महाराजांच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा