कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सने (CISCE) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे सर्वांगीण मूल्यमापन करण्यासाठी ‘SHINE 2026’ ही डिजिटल मूल्यांकन योजना सुरू केली आहे. SHINE म्हणजे ‘स्टुडंट होलिस्टिक इनसाइट अँड नर्चरिंग इव्हॅल्युएशन’ य
.
SHINE 2026 साठी नोंदणी प्रक्रिया 21 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. केवळ वार्षिक परीक्षांच्या निकालावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन न करता, त्यांच्या शिकण्याची स्थिती विविध टप्प्यांवर समजून घेणे हा या योजनेचा उद्देश आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या अनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या मूल्यांकनात इयत्ता 3, 5 आणि 8 नंतर अपेक्षित असलेल्या अध्ययन क्षमतांची तपासणी केली जाणार आहे. सध्या इयत्ता 4, 6 आणि 9 मध्ये शिकणारे विद्यार्थी या मूल्यांकनात सहभागी होतील. मूल्यांकन प्रक्रिया 15 ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या वयानुसार मूल्यांकनाची पद्धत वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. इयत्ता 4 साठी खेळावर आधारित मूल्यांकन केले जाणार आहे. त्यामुळे लहान विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया अधिक रंजक आणि त्यांच्या वयानुसार अनुकूल असेल. इयत्ता 6 आणि 9 मधील विद्यार्थ्यांचे डिजिटल मूल्यांकन अनुक्रमे इयत्ता 5 आणि 8 नंतर अपेक्षित असलेल्या अध्ययन क्षमतांच्या आधारे केले जाणार आहे.
मूल्यांकनानंतर तयार होणाऱ्या अहवालातून विद्यार्थ्यांची शिकण्याची पद्धत, चांगली कामगिरी असलेली क्षेत्रे तसेच ज्या संकल्पनांमध्ये अधिक मार्गदर्शनाची गरज आहे, याची माहिती शिक्षकांना मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अध्यापनाची दिशा ठरविणे शाळांना अधिक सोपे होणार आहे.
यापूर्वी घेण्यात आली होती प्रायोगिक चाचणी
CISCE ने यापूर्वी SHINE उपक्रमाची प्रायोगिक चाचणीही घेतली होती. या चाचणीत देशभरातील 273 शाळांमधील सुमारे एक लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. या चाचणीदरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आकलन, तर्कशक्ती, संकल्पनांचा व्यावहारिक वापर तसेच वयानुसार सामाजिक आणि भावनिक विकासाचे मूल्यांकन करण्यात आले होते.
हेही वाचा..
स्पष्ट पुरावे असूनही FIR का नाही?:सरकार कोणाला वाचवतंय?’; MPSC औषध निरीक्षक पेपरफुटीवरून मनसे आक्रमक, विद्यार्थी राज ठाकरेंच्या भेटीला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या पेपरफुटीच्या आरोपावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. पेपरफुटीचा आरोप करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांनी या प्रकरणातील कथित पेपरफुटीचे पुरावे राज ठाकरे यांच्यासमोर मांडले असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.सविस्तर वाचा..