![]()
प्रतिनिधी | अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात शासकीय सुट्टी, शनिवार, रविवार सलग सुट्यामुळे व वट पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला रविवारी पहाटेपासून दिवसभर भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केली. पहाटे पाच वाजल्यापासूनच शनिवारी मुक्कामी असलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर गजबजून गेले. शुक्रवारी शासकीय सुट्टी, शनिवार, रविवार सुट्टी यामुळे भाविकांची संख्या दुपटीने वाढली. हत्ती तलाव परिसर, अन्नछत्र मंडळ प्रांगणातील पार्किंगसह सर्वच पार्किंग भाविकांच्या वाहनाने भरून गेली होती. श्री वटवृक्ष स्वामी मंदिर ते समाधी मठापर्यंत मुख्य रस्त्यावर स्वामीभक्त दिसत आहेत. शुक्रवार, शनिवार व रविवारी या तीन दिवसांत एक लाख पेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतले. पुरुष व महिलांसाठी दोन स्वतंत्र रांगा होत्या. मंदिर परिसर, अन्नछत्र मंडळ प्रांगण, समाधीमठ, राजेराय मठ, शिवपुरी, गुरुमंदिर आदी ठिकाणी भाविकांनी गर्दी केली होती. तासाभरात सुमारे चार ते सहा हजार भाविक दर्शन घेत होते. तसेच समाधी मठ, चोळप्पा घर, राजेराय मठ, शिवपुरी, गुरुमंदिर, अन्नछत्र मंडळ आदी ठिकाणी गर्दी केली होती. सलग सुट्टी असल्याने भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच शुक्रवार, शनिवार व रविवार सलग सुट्टी व पौर्णिमा आल्याने भाविकांची संख्या वाढली. सलग सुट्टीमुळे वाढलेल्या गर्दीचे नियोजन करण्यात आले. भाविक धार्मिक पर्यटनांचा कुंटुंबियासह लाभ घेतला. अक्कलकोट तीर्थक्षेत्र भाविकांनी फ़ुलुन गेले. अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानातील दर्शनानंतर भाविक अन्नछत्र मंडळात महाप्रसादासाठी गर्दी केली होती. येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात संस्थापक ^सलग सुट्टी, वटपौर्णिमा पूर्वसंध्येला अन्नछत्र मंडळ परिसर भाविकांनी फ़ुलुन गेले. महाप्रसाद घेऊन व विविध न्यासाचे विविध उपक्रम पाहून भाविकांनी समाधान व्यक्त केले.” -अमोलराजे भोसले, मुख्य कार्यकारी अध्यक्ष ^वाढत्या गर्दीमुळे व वटपौर्णिमामुळे नित्य अभिषेक बंद असणार आहे. पहाटे पासून भाविकांनी गर्दी केली. – महेश इंगळे, अध्यक्ष – वटवृक्ष देवस्थान हत्ती तलाव परिसरात पूल व हत्ती तलाव काम सुरू असल्याने काही काळ वाहतूक कोणी झाली. मैंदर्गी रोडवरून अन्नछत्र मंडळ प्रांगण, कमलाराजे चौक परिसर, मल्लिकार्जुन मंदिर बस स्थानक, समाधी मठ, हत्ती तलाव परिसर,अक्कलकोट तीर्थक्षेत्र भाविकांनी फ़ुलुन गेले. अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानातील दर्शनानंतर भाविक अन्नछत्र मंडळात महाप्रसादासाठी गर्दी केली होती. संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंह भोसले व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नछत्र मंडळ परिसरात महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मंदिर प्रशासन व नगरपालिका व पोलिस प्रशासन गर्दी नियोजनासाठी सतत प्रयत्न करत होते. अक्कलकोट शहरात पाच ठिकाणी पार्किंगची सोय केली आहे. मंदिर परिसरात बैरेकेटिंग करून चारचाकी वाहन पार्किंगमध्ये सोडले गेले. वटवृक्ष मंदिरातील ऐतिहासिक वटवृक्ष, रुद्राक्ष स्वामी चित्र, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ प्रांगणातील अजानबाहू स्वामीची मूर्ती, स्वामी वाटिका, शिवसृष्टी, गणेश मंदिर, तुळजाई मंदिर, समाधी मठ, चोळप्पा महाराज यांचे घर, विहीर, पादुका, स्वामीच्या वापरलेल्या वस्तू या ठिकाणी गर्दी करत आहेत. वटवृक्ष स्वामी मंदिरात शनिवार, रविवार सलग सुट्यामुळे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अन्नछत्र परिसर भाविकांनी फुलून गेला वाढत्या गर्दीमुळे नित्य अभिषेक बंद ठेवले
Source link
धार्मिक:सलग सुट्ट्या, वटपौर्णिमेमुळे अक्कलकोट नगरीत 1 लाखांहून अधिक भक्तांचे दर्शन