Headlines

सहकाऱ्याच्या अघोरी कृत्याने कामगाराचा मृत्यू;:गुदद्वारात सोडली कॉम्प्रेसरची उच्च दाबाची हवा, पुण्यातील सणसवाडीत धक्कादायक घटना




पुणे जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत संतापजनक आणि अमानुष घटना सणसवाडी औद्योगिक वसाहतीमधून उघडकीस आली आहे. एका कंपनीत रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत असताना, एका सहकाऱ्याने दुसऱ्या कामगाराच्या गुदद्वारात उच्च दाबाच्या हवेचा कॉम्प्रेसर पाईप घुसवला. या भयानक कृत्यामुळे पोटात प्रचंड दाबाने हवा गेल्याने, एका ४२ वर्षीय परप्रांतीय कामगाराचा उपचारादरम्यान अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही काळजाचा ठोका चुकवणारी घटना ३० जून २०२६ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास सणसवाडीच्या औद्योगिक वसाहतीतील ‘वेस्टर्न इंडिया फोर्ज प्रा. लि.’ कंपनीत घडली. नरेश सुलेंद्र यादव (वय ४२, मूळ रा. गया, बिहार) असे मृत कामगाराचे नाव आहे. तर बिकीकुमार भाईलाल सरोज असे आरोपीचे नाव आहे. हवा पोटात शिरल्याने अंतर्गत अवयवांना गंभीर इजा मृत कामगार नरेश यादव यांचे मेहुणे संतोषकुमार किशोर यादव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रात्रीची शिफ्ट संपत आलेली असताना आरोपी बिकीकुमार याने अचानक नरेश यादव यांच्या गुदद्वारात कॉम्प्रेसरचा पाईप लावला. या पाईपमधून अत्यंत उच्च दाबाची हवा बाहेर पडत होती. ही हवा थेट नरेश यांच्या पोटात शिरल्याने त्यांच्या पोटातील अंतर्गत अवयवांना गंभीर इजा झाली आणि ते वेदनेने विव्हळत जागीच कोसळले. त्यांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कंपनीतील कामगारांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह एखाद्या मोठ्या कंपनीच्या आवारात आणि ड्युटीवर असताना कामगारांसोबत असा जीवघेणा प्रकार घडल्याने औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कंपनीच्या वर्कशॉपमध्ये सुपरवायझर्सचे नियंत्रण नव्हते का? आणि सुरक्षेचे नियम पाळले जात होते का? असे अनेक गंभीर प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत. पोलिसांचा कसून तपास सुरू या संपूर्ण प्रकरणाचा तपास शिक्रापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कारंडे करत आहेत. तपासाबाबत माहिती देताना ते म्हणाले, आरोपी बिकीकुमारने हे कृत्य मस्करीत केले, की त्यामागे काही पूर्ववैमनस्य किंवा वेगळा हेतू होता, याचा सखोल तपास सध्या सुरू आहे. या दुर्दैवी घटनेत कंपनी व्यवस्थापनाचा काही निष्काळजीपणा आहे का? याचीही पडताळणी पोलीस करत आहेत. सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास कंपनी प्रशासनावरही कडक कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हे ही वाचा… प्रशासनाचा जीवघेणा हलगर्जीपणा:पूर्वसूचनेविना धरणातून पाणी सोडले, ट्रॅक्टरसह 3 कामगार वाहून गेले; दैव बलवत्तर म्हणून बचावले कोणतीही पूर्वकल्पना किंवा ‘अलर्ट’ न देता धरणातून पाण्याचा विसर्ग करणे किती जीवघेणे ठरू शकते, याचा भयंकर प्रकार भंडारा जिल्ह्यात समोर आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा बॅरेजमधून अचानक लाखो क्युसेक पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात आले. या पाण्याच्या जोरदार प्रवाहात तुमसर तालुक्यातील माडगी येथे नदीपात्रात काम करणारे तीन कामगार ट्रॅक्टरसह वाहून गेले. सुदैवाने या तिघांनीही वेळेवर किनारा गाठल्याने मोठी जीवितहानी टळली; मात्र, ट्रॅक्टर पूर्णपणे जलमय झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *